Hathras Gangrape : मेधा पाटकरांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट, 'हे' प्रश्न विचारत योगी सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 04:22 PM2020-10-10T16:22:55+5:302020-10-10T16:47:36+5:30
Medha Patkar And Hathras Gangrape Case : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्यानंतर मेधा पाटकर यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हाथरस - हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची वेगाने चौकशी सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्यानंतर मेधा पाटकर यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकार आणि पोलीस प्रशासनाला अनेक प्रश्न विचारत निशाणा साधला आहे. मेधा पाटकर यांनी वैद्यकीय तपासावरून उत्तर प्रदेश सरकारला घेरलं आहे. पीडितचे कुटुंबीय आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत खोटी विधानं करणार नाहीत असं मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे.
"पीडितेच्या कुटुंबीयांना आजपर्यंत शवविच्छेदन अहवाल का दिला गेला नाही?, पीडितेला दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) घेऊन जाण्याऐवजी सफदरजंग रुग्णालयात का नेले गेले?" असे प्रश्न मेधा पाटकर यांनी विचारले आहेत. मेधा पाटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईवर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले. जिल्हाधिकाऱ्यांचे जे कर्तव्य आहे ते पूर्ण केले गेले पाहिजे होते, सरकारची देखील नैतिक जबाबदारी असते असंही मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Hathras Gangrape : पीडित तरुणीचे कुटुंबीय आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी हे फोनच्या माध्यमातून सातत्याने एकमेकांच्या संपर्कात https://t.co/duQ6LvXiFf#Hathras#HathrasHorror#HathrasHorrorShocksIndia#UttarPradesh#uttarpradeshpolice
— Lokmat (@MiLOKMAT) October 8, 2020
हाथरस प्रकरणात 'नवा ट्विस्ट', आरोपीने पीडितेच्या भावाचा नंबर 'या' नावाने केला होता सेव्ह
उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणाची वेगाने चौकशी सुरू आहे. तपासासोबतच आता कुटुंबाला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. हाथरस तपासादरम्यान या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पुन्हा एकदा हाथरस प्रकरणात 'नवा ट्विस्ट' आला आहे. पीडित तरुणीचे कुटुंबीय आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी हे फोनच्या माध्यमातून सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती याआधी समोर आली होती. मात्र आता आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Hathras Gangrape : "पोलीस माझ्या बहिणीचे चारित्र्यहनन करताहेत, गरीब असल्याने फसवण्याचा प्रयत्न", पीडितेच्या भावाचा आरोपhttps://t.co/VKPbtW7OOL#Hathras#HathrasHorror#HathrasHorrorShocksIndia#UttarPradesh#uttarpradeshpolice
— Lokmat (@MiLOKMAT) October 8, 2020
चंदपा परिसरातील गावात सामूहिक बलात्कार प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप याने आपल्या मोबाईलमध्ये पीडितेच्या भावाचा फोन नंबर हा "सॅनिटायझर" या नावाने सेव्ह केल्याची नवी माहिती आता समोर आली आहे. कोरोनाच्या संकटात सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून त्याचीच अनेकदा चर्चा असते. मात्र आता आरोपीने पीडितेच्या भावाचा मोबाईल नंबर सॅनिटायझर या नावाने सेव्ह करून ठेवल्याने याची अधिक चौकशी सुरू आहे.
Hathras Gangrape : 200 अज्ञात लोकांविरोधात एफआयआर दाखल, गावकऱ्यांची टेस्ट करण्यामागे 'हे' आहे कारणhttps://t.co/Q0fCtTaFmi#HathrasCase#coronavirus#coronatest#coronavirusindia#UttarPradesh
— Lokmat (@MiLOKMAT) October 7, 2020
"पोलीस माझ्या बहिणीचं चारित्र्यहनन करताहेत, गरीब असल्याने फसवण्याचा प्रयत्न"
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पीडित कुटुंब आणि आरोपीमध्ये तब्बल 104 वेळा संभाषण झाले होते, असा दावा उत्तर प्रदेशपोलिसांनी केला आहे. यानंतर आता पोलीस माझ्या बहिणीचं चारित्र्यहनन करत आहेत असा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे. पीडितेच्या मोठ्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, "हा आमच्याविरोधात रचलेला कट आहे. मारेकरी अतिशय चलाख आहेत. स्वत:ला वाचवण्यासाठी ते काहीही करू शकतात. 10 वर्षांपूर्वी आपण वडिलांसाठी एक सिम विकत घेतलं होतं मात्र त्यांचा फोन नेहमी हरवायचा. यासाठी आपण आपल्या आयडीने सिम विकत घेतलं. हा फोन नेहमीच घरीच असतो. गावातील सर्वांकडे, इतकेच काय पण ग्रामप्रमुखांकडेदेखील आमचा हा एकच नंबर आहे. या फोनचा उपयोग अधिकतर वडीलच करतात. मात्र मुख्य आरोपी संदीपशी कधीही संपर्क केला नाही."
Hathras Gangrape : "हाथरस घटनेतील पीडित कुटुंबास न्याय देण्याच्या जनतेच्या मागणीवर सरकारने लक्ष केंद्रीत केलं, तर अधिक योग्य राहील" https://t.co/eYZsD45nMN#HathrasCase#Mayawati#YogiAdityanath#UttarPradeshpic.twitter.com/VZqfbMGUpG
— Lokmat (@MiLOKMAT) October 6, 2020