मेधा पाटकर यांनी उपोषण मागे घ्यावे, प्रकृतीत बिघाड झाल्याने भाकपची विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:37 AM2017-08-05T00:37:48+5:302017-08-05T00:37:51+5:30

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पार्टीने शुक्रवारी केले आहे. सरदार सरोवर प्रकल्पामुळे ज्या ४० हजार कुटुंबांची घरे आणि जमिनी पाण्याखाली जाऊ शकतात

 Medha Patkar should withdraw the fast, request for CPI after due to fault in nature | मेधा पाटकर यांनी उपोषण मागे घ्यावे, प्रकृतीत बिघाड झाल्याने भाकपची विनंती

मेधा पाटकर यांनी उपोषण मागे घ्यावे, प्रकृतीत बिघाड झाल्याने भाकपची विनंती

googlenewsNext

नवी दिल्ली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पार्टीने शुक्रवारी केले आहे. सरदार सरोवर प्रकल्पामुळे ज्या ४० हजार कुटुंबांची घरे आणि जमिनी पाण्याखाली जाऊ शकतात, त्यांच पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी मेधा पाटकर वा अन्य १२ जण आठ दिवसांपासून उपोषण करीत आहेत. मेधा पाटकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
भाकपचे राष्ट्रीय सचिव डी. राजा म्हणाले की, या लढाईत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. हा मुद्दा आम्ही संसदेत उपस्थित करणार आहोत. मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील आंदोलकांना बळजबरीने हटविण्यासाठी कोणतेही पाऊल उचलू नये, अशी मागणीही त्यांनी केली.
उपोषणामुळे मेधा पाटकर यांच्या आरोग्यावर पारिणाम होत असल्याचे सांगून ते म्हणाले की, पाटकर यांनी उपोषण मागे घ्यावे. या आव्हानात्मक परिस्थितीत आम्हाला त्यांची गरज आहे. प्रख्यात अमेरिकी इतिहासकार नोम चोमस्की हे अलीकडेच या प्रकल्पामुळे प्रभावित लोकांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्यांनी एका आॅनलाइन याचिकेवर स्वाक्षरी केली आहे. या प्रकरणी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
केजरीवाल यांचे विस्थापितांना समर्थन
नर्मदा सरोवरामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मध्य प्रदेश सरकारने पुढे यावे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केले आहे. मेधा पाटकर यांच्या बिघडत्या आरोग्याबाबतही त्यांनी काळजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मध्य प्रदेशातील भाजप सरकारने मेधा पाटकर यांच्याशी संपर्कही साधलेला नाही. सरोवराचे दरवाजे बंद करण्यापूर्वी सरकारने विस्थापितांशी चर्चा करायला हवी. या प्रकल्पामुळे बडवानी, धार, अलीराजपूर आणि खरगोन जिल्ह्यांतील हजारो लोकांना आपली घर सोडावी लागणार आहेत.

Web Title:  Medha Patkar should withdraw the fast, request for CPI after due to fault in nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.