राजधानी दिल्लीत १२ मार्चला मेधा पाटकरांचा ‘दांडी मार्च’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 04:21 AM2020-03-07T04:21:47+5:302020-03-07T04:22:24+5:30
महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी अर्थात राजघाटावर दांडी मार्च संपेल. महात्मा गांधींच्या ऐतिहसिक दांडी यात्रेला यंदा ९० वर्ष पूर्ण होत आहेत. १९३० साली महात्मा गांधीजींच्या दांडी मार्चने ब्रिटीश साम्राज्य हादरले होते.
नवी दिल्ली : राजधानीवासीयांना शांती व सौहार्दाचा संदेश देण्यासाठी प्रसिद्ध समाजसेविका मेधा पाटकर व संदीप पांडेय येत्या १२ मार्चला जामा मशिदीपासून दांडी मार्च काढतील. महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी अर्थात राजघाटावर दांडी मार्च संपेल. महात्मा गांधींच्या ऐतिहसिक दांडी यात्रेला यंदा ९० वर्ष पूर्ण होत आहेत. १९३० साली महात्मा गांधीजींच्या दांडी मार्चने ब्रिटीश साम्राज्य हादरले होते.
गांधीजींच्या मार्गानेच सर्वांनी जावे तरच सौहार्द राहील, अशी भावना आयोजक संस्थेचे प्रमुख फैसल खान यांनी दिली. तीन दिवस दांडी मार्चनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिल्लीत लोकांमधील कटुता संपावी, सौहार्द नांदावे, सलोखा प्रस्थापित व्हावा, यासाठी दांडी मार्च काढला जाईल, असे ‘खुदाई खिदमतगार’ या संघटनेने म्हटले आहे. यात्रेच्या समारोपास राजघाटावर सर्वधर्म प्रार्थना होतील.