रघुराम राजन यांच्या फेरनियुक्तीमध्ये माध्यमांनी जास्त रस घेऊ नये - पंतप्रधान मोदी
By admin | Published: May 27, 2016 05:17 PM2016-05-27T17:17:09+5:302016-05-27T17:17:09+5:30
रघुराम राजन यांची त्याच पदावर फेरनियुक्ती हा प्रशासकीय विषय असून, प्रसारमाध्यमांनी त्यात जास्त रस घेऊ नये असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांची त्याच पदावर फेरनियुक्ती हा प्रशासकीय विषय असून, प्रसारमाध्यमांनी त्यात जास्त रस घेऊ नये असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सूचक विधान केले. मोदींना राजन यांच्या फेरनियुक्तीसंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मोदींनी हे विधान केले.
राजन यांची फेरनियुक्ती प्रशासकीय विषय असून, त्यात माध्यमांनी इंटरेस्ट दाखवावा असे मला वाटत नाही असे मोदी म्हणाले. रघुराम राजन यांचा आरबीआयचे गर्व्हनर म्हणून कार्यकाळ येत्या सप्टेंबरमध्ये संपणार आहे. रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेवरुन वेळोवेळी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
त्यामुळे सरकारमध्ये त्यांच्याविषयी नाराजी असल्याची चर्चा आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून राजन यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. आरबीआय आणि सरकारची नेहमीच चर्चा सुरु असते आणि ही प्रक्रिया कायम राहिल असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.