वैद्यकीय महाविद्यालये ६५ टक्क्यांहून अधिक वाढली; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 11:44 AM2022-12-25T11:44:07+5:302022-12-25T11:45:06+5:30

राजकोटमधील श्री स्वामीनारायण गुरुकुलच्या अमृत महोत्सवाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते.

medical colleges grew by more than 65 percent pm narendra modi claim | वैद्यकीय महाविद्यालये ६५ टक्क्यांहून अधिक वाढली; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा

वैद्यकीय महाविद्यालये ६५ टक्क्यांहून अधिक वाढली; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा

Next

राजकोट : देशात प्रथमच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे दूरदर्शी आणि भविष्याभिमुख शिक्षण व्यवस्था तयार केली जात आहे. देशाचे हरवलेले वैभव परत आणण्यासाठी मागील सरकारांनी त्यांच्या ‘गुलाम मानसिकते’मुळे काहीही केले नाही. आज देशात आयआयटी, आयआयएम आणि एम्ससारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थांची संख्या वाढत आहे. २०१४ नंतर वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत ६५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

राजकोटमधील श्री स्वामीनारायण गुरुकुलच्या अमृत महोत्सवाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना मोदी बोलत होते. आता देशात भविष्याभिमुख अशी शिक्षण व्यवस्था निर्माण होत आहे, असेही मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: medical colleges grew by more than 65 percent pm narendra modi claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.