निष्काळजीपणाचा कळस! जखमेला टाक्यांऐवजी लावलं फेवीक्विक; रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 10:48 AM2023-05-08T10:48:54+5:302023-05-08T10:55:55+5:30

एका चिमुकल्याला झालेल्या जखमेवर टाके घालण्याऐवजी फेवीक्विकने उपचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

medical staff uses fevikwik instead of stitches for child head injury in telangana | निष्काळजीपणाचा कळस! जखमेला टाक्यांऐवजी लावलं फेवीक्विक; रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

निष्काळजीपणाचा कळस! जखमेला टाक्यांऐवजी लावलं फेवीक्विक; रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

googlenewsNext

तेलंगणातील जोगुलम्बाबा गडवाल जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. एका चिमुकल्याला झालेल्या जखमेवर टाके घालण्याऐवजी फेवीक्विकने उपचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनेचा तपास केला असता, खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उपचारात निष्काळजीपणा दाखविल्याचे निष्पन्न झाले. ही बाब उघडकीस येताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जोगुलम्बा गडवाला जिल्ह्यातील आयझा येथील खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी टाक्यांऐवजी फेवीक्विक लावून जखमी मुलावर उपचार केले. मुलगा पडल्यामुळे जखमी झाला होता. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील लिंगसोगुर येथील रहिवासी असलेले वंशकृष्ण हे पत्नी सुनीता आणि मुलगा प्रवीण यांच्यासोबत तेलंगणामध्ये राहणाऱ्या नातेवाईकांच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रमादरम्यान खेळत असताना प्रवीण खाली पडला.

खेळताना पडल्यामुळे प्रवीणच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या भागाला दुखापत झाली. उपचारासाठी त्याला स्थानिक खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्याची जखम खोलवर होती. जखमेवर टाके घालण्याऐवजी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी फेवीक्विक लावले. हा प्रकार त्याच्या वडिलांना कळताच त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर आरोपी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

वंशकृष्ण यांनी याबाबत आयजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शुक्रवारी या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने मुलाच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे. ते म्हणतात की हे आमच्या मुलासाठी धोक्याचे असू शकते. या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: medical staff uses fevikwik instead of stitches for child head injury in telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.