कमाल! बँकेतून कर्ज घेऊन पूर्ण केलं शिक्षण; आधी डॉक्टर आणि नंतर झाली पोलीस अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 04:22 PM2023-08-07T16:22:44+5:302023-08-07T16:23:46+5:30

एका सामान्य कुटुंबातील मुलीसाठी एमबीबीएस शिकणं सोपं नव्हतं. पण मीनाक्षी कात्यायन आपल्या स्वप्नांबद्दल आणि आयुष्याबद्दल स्पष्ट होत्या.

Meenakshi Katyayan ips success story doctor turned ips biography upsc exam topper | कमाल! बँकेतून कर्ज घेऊन पूर्ण केलं शिक्षण; आधी डॉक्टर आणि नंतर झाली पोलीस अधिकारी

कमाल! बँकेतून कर्ज घेऊन पूर्ण केलं शिक्षण; आधी डॉक्टर आणि नंतर झाली पोलीस अधिकारी

googlenewsNext

UPSC परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो उमेदवारांपैकी मोजकेच उमेदवार त्यात यशस्वी होऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात. IPS मीनाक्षी कात्यायन या 2014 बॅचच्या IPS अधिकारी आहेत. मीनाक्षी कात्यायन यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. त्यांची सक्सेस स्टोरी समोर आली आहे. 

मीनाक्षी कात्यायन या मुळच्या झारखंडची राजधानी रांचीच्या आहेत. एका सामान्य कुटुंबातील मुलीसाठी एमबीबीएस शिकणं सोपं नव्हतं. पण मीनाक्षी कात्यायन आपल्या स्वप्नांबद्दल आणि आयुष्याबद्दल स्पष्ट होत्या. काय आणि कसं करायचं ते त्यांना माहीत होतं.

मीनाक्षी कात्यायन या देशातील काही आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत ज्या डॉक्टर झाल्यानंतर सरकारी सेवेत रुजू झाल्या. देशात एमबीबीएसचे शिक्षण खूप महाग आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलीसाठी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणे कठीण होते. त्यामुळे मीनाक्षी य़ांनी एमबीबीएसच्या शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते.

मीनाक्षी यांनी एमबीबीएस केल्यानंतर एम्समध्ये ज्युनिअर डॉक्टर म्हणून काम केलं आहे. त्यांचा जन्म 12 जुलै 1982 रोजी झाला. तिचे पती एम्समध्ये डॉक्टर आहेत. मीनाक्षीने बिहारमधील बेगुसराय येथे पोलिओ निर्मूलनासाठी जागतिक आरोग्य संघटनेसोबत (WHO) काम केलं आहे.

पहिल्याच प्रयत्नात डॉ. मीनाक्षी कात्यायन या आयपीएस अधिकारी झाल्या. त्यांनी 2012 मध्ये UPSC ची परीक्षा दिली आणि त्यात त्या यशस्वी झाला आणि त्यांना UP कॅडर देण्यात आले. 2018 मध्ये त्यांना भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ पदावर बढती मिळाली. वैद्यकीय शिक्षणामुळे त्यांना गुन्ह्याचा तपास करणे सोपे जाते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Meenakshi Katyayan ips success story doctor turned ips biography upsc exam topper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.