खळबळजनक! नवरी नटली, हळद लागली, आंघोळीला गेली अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 01:02 PM2023-02-07T13:02:10+5:302023-02-07T13:03:27+5:30

घरामध्ये महिला कॉन्स्टेबलच्या लग्नाची तयारी सुरू होती आणि महिला कॉन्स्टेबल हळदी समारंभानंतर आंघोळीसाठी गेली होती. बराच वेळ ती बाथरूममधून न आल्याने घरातील सदस्यांनी दरवाजा तोडला असता...

meerut female constable went to bath after haldi ceremony dead body found in bathroom | खळबळजनक! नवरी नटली, हळद लागली, आंघोळीला गेली अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

फोटो - आजतक

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये लग्नाच्या दोन दिवस आधी बाथरूममध्ये महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घरामध्ये महिला कॉन्स्टेबलच्या लग्नाची तयारी सुरू होती आणि महिला कॉन्स्टेबल हळदी समारंभानंतर आंघोळीसाठी गेली होती. बराच वेळ ती बाथरूममधून न आल्याने घरातील सदस्यांनी दरवाजा तोडला असता महिला बाथरूमच्या फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसले.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी या घटनेनंतर डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. हे प्रकरण मेरठच्या सरधना पोलीस स्टेशन क्षेत्रातील अहमदाबाद गावाशी संबंधित आहे, जिथे राहणाऱ्या गीता तालियान 2011 मध्ये उत्तर प्रदेश पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्या होत्या.

सध्या त्यांची पोस्टिंग मुझफ्फरनगरमध्ये झालं आहे. मंगळवार, सात फेब्रुवारीला बुलंदशहरच्या गुलावठी भागातील नथुगढ़ी गावातून गीताची वरात येणार होती. रविवारी दुपारी हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर गीता बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली असता बराच वेळ काहीच हालचाल न झाल्याने घरातील सदस्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला असता त्यांना गीता बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली.

गीताला बाहेर काढून डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नवरीच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे आणि लग्नाच्या आनंदाचे दु:खात रूपांतर झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

बुलंदशहरमधील गुलावठी येथील नथुगढ़ी गावात राहणाऱ्या सुमित तेवतियासोबत गीताचा विवाह होणार होता. सुमित हा देखील पोलिसात हवालदार असल्याचे सांगण्यात येत आहे. नववधूच्या मृत्यूची माहिती वराकडच्या लोकांना देण्यात आली आणि तेही घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी सीओ सरधना ब्रिजेश सिंह यांनी सांगितले की, सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: meerut female constable went to bath after haldi ceremony dead body found in bathroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.