मुस्कान आई होणार...! प्रेग्नंसी रिपोर्ट पॉजिटिव्ह; पतीच्या हत्येच्या आरोपाखाली आहे मेरठ तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:45 IST2025-04-07T17:44:23+5:302025-04-07T17:45:45+5:30
सोमवारी जिल्हा रुग्णालयातून महिला डॉक्टर मेरठ येथील चौधरी चरण सिंग ककारागृहात पोहोचल्या होत्या...

मुस्कान आई होणार...! प्रेग्नंसी रिपोर्ट पॉजिटिव्ह; पतीच्या हत्येच्या आरोपाखाली आहे मेरठ तुरुंगात
उत्तर प्रदेशातील सौरभ हत्याकांड प्रकरणातील आरोपी मुस्कान रस्तोगी सध्या मेरठ कारागृहात बंद असून तिची प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. खुद्द 'सीएमओ'ने मुस्कान प्रेग्नंट असल्याची पुष्टी केली आहे. तिच्या तपासणीसाठी आणि आवश्यकतेनुसार तिची पेग्नंसी टेस्ट करण्यासाठी. मेरठ कारागृह प्रशासनाने मेरठच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना (CMO) पत्र पाठवले होते. यानंतर, जिल्हा रुग्णालयातील एक चमू तिला तपासण्यासाठी कारागृहात पोहोचला होता.
मेरठ कारागृहाने मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात गायनॅकॉलॉजिस्टला (स्त्रीरोगतज्ज्ञ) कारागृहात पाठवण्याची मागणी केली होती. तेथे, मुस्कान आणि आणखी एका महिलेची तपासणी करायची होती. यानंतर, आज सोमवारी जिल्हा रुग्णालयातून महिला डॉक्टर मेरठ येथील चौधरी चरण सिंग ककारागृहात पोहोचल्या होत्या.
मुस्कान ठणठणीत, नशेची लक्षणंही नाहीत... -
कारागृहात मुस्कानची प्रकृती खालावल्या दावा नुकताच काही माध्यमांतील वृत्तांमध्ये करण्यात आला होता. मात्र, मेरठ कारागृहाचे वरिष्ठ कारागृह अधीक्षक वीरेश राज शर्मा यांनी हे फेटाळले असून मुस्कान केवळ ठणठणीतच नाही, तर नशेची लक्षणेही आता पूर्णपणे गेली आहेत.
जेव्हा एखाद्या महिलेला कारागृहात ठेवले जाते, तेव्हा तिच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी होत -
विरेशे राज शर्मा म्हणाले, खरे तर, एखाद्या महिलेला जेव्हा कारागृहात ठेवले जाते, तेव्हा तिच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी होत असते. विशेषतः जर एखादी महिला आधीच गर्भवती असेल अथवा अशी कोणतीही शक्यता असल्यास तुरुंग प्रशासनाचे तिच्यावर नियमित लक्ष असते. ही एक नियमित प्रक्रिया आहे. महिला बंदिवानांची संख्या जेव्हा वाढते, तेव्हा त्यांची सामूहिक आरोग्य तपासणी केली जाते.