लय भारी! काही वर्षांपूर्वी 'तो' रिक्षा चालवायचा अन् आता शेतीतून 'अशी' करतोय लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 06:08 PM2021-10-31T18:08:36+5:302021-10-31T18:14:07+5:30

Dharambir Kamboj : काही वर्षांपूर्वी रिक्षा चालवणारी व्यक्ती आता शेतीतून लाखोंची कमाई करत असल्याची घटना घडली आहे.

meet Dharambir Kamboj who was rickshaw puller now earning lakhs with farming | लय भारी! काही वर्षांपूर्वी 'तो' रिक्षा चालवायचा अन् आता शेतीतून 'अशी' करतोय लाखोंची कमाई

लय भारी! काही वर्षांपूर्वी 'तो' रिक्षा चालवायचा अन् आता शेतीतून 'अशी' करतोय लाखोंची कमाई

Next

नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेकदा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये रिक्षा चालवणारी व्यक्ती आता शेतीतून लाखोंची कमाई करत असल्याची घटना घडली आहे. धरमबीर कम्बोज (Dharambir Kamboj) असं या व्यक्तीचं नाव असून ते सध्या शेतीतून लाखो रुपये कमावत आहेत. हरियाणाच्या यमुनानगरमधील दंगला गावात राहणारे धरमबीर हे 1986 मध्ये दिल्लीत रिक्षा चालवायचे. याच दरम्यान ते कृषी विद्यापीठाच्या संपर्कात आले आणि तिथे त्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळाली. 

धरमबीर यांनी शेतीबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली, शेतीसोबतच त्यांनी प्रोसेसिंग मशीन तयार करण्याचं देखील काम सुरू केलं. सर्वप्रथम त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक हलक्या वजनाची स्प्रे मशीन तयार केली. जी शेतकरी कमरेला लावून अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने स्प्रे करू शकतात. त्यानंतर त्यांनी मशरूमची शेती करण्यास सुरुवात केली. यावेळी स्थानिक प्रशासनाने देखील त्यांची मदत केली. तसेच शेतीमध्ये त्यांनी सातत्याने नवनवीन प्रयोग केले. कमीत कमी रासायनिक गोष्टींचा वापर करता यावा यासाठी त्यांनी हर्बल फार्मिंगवर काम केलं. 

शेतीतून खूप लोकांना उपलब्ध करून दिला रोजगार 

कम्बोज हे शेतीसोबतच स्वत: देखील नवीन गोष्टी शिकत होते. ते वेगवेगळया राज्यांमध्ये जाऊन तेथील शेतकऱ्यांची भेट घ्यायचे, त्यांच्याशी संवाद साधायचे. धरमबीर कम्बोज यांनी आपल्या शेतीतून खूप लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांच्याकडे सध्या 25 महिला काम करतात. तसेच वर्षभरात 120 मशीन तयार केल्या जातात. 55,000 रुपयांपासून ते 1.90 लाखांपर्यंत किमतीत त्यांची विक्री किली जाते. धरमबीर वर्षाला 15 ते 20 लाख कमावत आहेत. त्यांनी आपल्या प्रोसेसिंग मशीनच्या माध्यमातून गुलाब, चेरी, खजूर यांच्यापासून इतर गोष्टी तयार केल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


 

Web Title: meet Dharambir Kamboj who was rickshaw puller now earning lakhs with farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.