आव्हाणे अतिसारप्रकरणी एफआयआर सीईओंची भेट : दोन तास पाहणी व चर्चा
By admin | Published: June 8, 2016 11:03 PM2016-06-08T23:03:45+5:302016-06-08T23:03:45+5:30
जळगाव : आव्हाणे ता.जळगाव येेथे झालेल्या अतिसाराच्या लागणप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यासह मागील काळात पाणी योजनांबाबत किती निधी खर्च झाला व त्याचा विनियोग कसा केला याची चौकशी करण्याचे आदेश जि.प.च्या सीईओंनी बुधवारी दिले आहेत.
Next
ज गाव : आव्हाणे ता.जळगाव येेथे झालेल्या अतिसाराच्या लागणप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यासह मागील काळात पाणी योजनांबाबत किती निधी खर्च झाला व त्याचा विनियोग कसा केला याची चौकशी करण्याचे आदेश जि.प.च्या सीईओंनी बुधवारी दिले आहेत. आव्हाणे येथे अतिसारामुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याने सीईओ आस्तिककुमार पांडेय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कुटे व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी बुधवारी सायंकाळी गावात जाऊन पाहणी केली. व्हॉल्व्हची गळती, बालाजीनगर व भिल्लवाड्यातील जलकुंभ, उपचारार्थ दाखल असलेले रुग्ण आदींची पाहणी सीईओ व वरिष्ठ अधिकार्यांनी केली. अस्वच्छता, दूषित पाण्याप्रकरणी कानळदा आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांसह गावातील पाणीपुरवठा कर्मचारी, ग्रामसेवक आदींची कानउघाडणी सीईओ यांनी केली. एवढ्या अस्वच्छतेमध्ये ग्रामस्थ राहण्यास पदाधिकारी व यंत्रणा जबाबदार असल्याचा ठपका सीईओंनी ठेवला. यानंतर ग्रा.पं.सदस्य ॲड.हर्षल चौधरी, कैलास पाटील आदींनी आपली भूमिका मांडली. सुमारे दोन तास सीईओ आव्हाणे येथे होते. दोषींवर कारवाईया प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, तसेच पाणी योजनांबाबत चौकशी, तपासणी करून कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.