Eknath Shinde: भेटला 'विठ्ठल' माझा... पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री शिंदेंच्या हसत-हसत गप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 05:45 PM2022-07-09T17:45:46+5:302022-07-09T17:48:56+5:30

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मोदी भेटीपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली.

Meet Vitthal Mazha ... Laughing and chatting with Chief Minister Eknath Shinde's Prime Minister | Eknath Shinde: भेटला 'विठ्ठल' माझा... पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री शिंदेंच्या हसत-हसत गप्पा

Eknath Shinde: भेटला 'विठ्ठल' माझा... पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री शिंदेंच्या हसत-हसत गप्पा

googlenewsNext

मुंबई - मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. आज दुपारी साडेचार ते 5 च्या सुमारास त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियातून समोर आले आहे. त्यामध्ये, मोदींसोबत चर्चा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हसताना दिसत आहेत. तर, मोदींच्या चेहऱ्यावरही हसू उमटल्याचे दिसून येते. या भेटीत मुख्यमंत्री शिंदेंनी विठ्ठल-रखुमाईची मूर्ती भेट दिली. 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मोदी भेटीपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीचा दौरा ही सदिच्छा भेट असून आम्हाला दिल्लीतील सर्वच नेत्यांनी शुभेच्छा देत पाठिशी समर्थपणे असल्याचं म्हटलं होतं. आता, मोदी भेटीचे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेतच्या बैठकीत नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यत्वे चर्चा झाल्याचे समजते. दिल्ली दौऱ्यात केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी मुख्यत्वे चर्चा झाली असून आषाढी एकादशीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनीही आषाढी एकादशीनंतर तुम्हाला माहिती मिळेल, असे पत्रकारांशी बोलताना म्हटले. 
 

Web Title: Meet Vitthal Mazha ... Laughing and chatting with Chief Minister Eknath Shinde's Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.