वास्कोत रविवारी बहुजन समाजबांधवाची बैठक
By admin | Published: May 9, 2015 01:45 AM2015-05-09T01:45:09+5:302015-05-09T01:45:09+5:30
वास्को : २४ मे रोजी कुंडई येथील तपोभूमीवर होणार्या गोमंतक बहुजन समाजाच्या महामेळाव्याविषयी जनजागृती करण्यासाठी वास्कोत रविवार दि. १० रोजी जनता वाचनालय सभागृहात सकाळी १० वाजता मुरगाव तालुक्यातील बहुजन समाजातील विविध ज्ञातीबांधवांची बैठक बोलविण्यात आली आहे.
Next
व स्को : २४ मे रोजी कुंडई येथील तपोभूमीवर होणार्या गोमंतक बहुजन समाजाच्या महामेळाव्याविषयी जनजागृती करण्यासाठी वास्कोत रविवार दि. १० रोजी जनता वाचनालय सभागृहात सकाळी १० वाजता मुरगाव तालुक्यातील बहुजन समाजातील विविध ज्ञातीबांधवांची बैठक बोलविण्यात आली आहे. वास्कोतील या बैठकीत महासंघाचे अध्यक्ष अनिल होबळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत चोडणकर व प्रकाश वेळीप, सचिव डॉ. उदय गावकर, उपाध्यक्ष शंभू भाऊ बांदेकर, सीताराम तळवडकर, देवानंद नाईक, आदी महासंघाचे नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान या सभेच्या पूर्वतयारीसाठी मंगळवारी (दि.५) वास्को येथील कलावृंद सभागृहात मुरगाव तालुक्यातील विविध समाजांच्या नेत्यांची बैठक पद्मनाभ आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या बैठकीत सीताराम तळवडेकर, नितीन चोपडेकर, मंगलदास नाईक, उत्तम आजगावकर, दिनानाथ निखडेकर, अंकुश वालावलकर, मुरारी बांदेकर, पाश्कोल डिसोझा, संतोष केरकर, दिलीप डोंगरीकर, एस.के. जाधव, दिलीप च्यारी, अंकुश च्यारी, केशव शेट वेर्णेकर, बिपीन चोडणकर आणि इतरांनी उपस्थित राहून आपापले विचार मांडले.