भारतीय अधिकारी व जाधव भेटीतून पाकचा खोटेपणा उघड, भेटीतील चर्चाही ऐकण्याचा केला प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 03:47 AM2020-07-17T03:47:13+5:302020-07-17T06:52:34+5:30
भारतीय अधिका-यांना जाधव यांना भेटण्याची संमती पाकिस्तानने गुरुवारी दिली. कुलभूषण जाधव स्वत:च्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्टीय न्यायालयात आव्हान देऊ इच्छित नाही, असे पाकिस्तान सांगत होता.
नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने तुरुंगात डांबलेल्या कुलभूषण जाधव यांना भारतीय अधिकारी दुसऱ्यांदा भेटले खरे, पण त्यांच्यातील संभाषण चोरून ऐकण्याचा घाणेरडा प्रकार पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केलाच. शिवाय जाधव आणि भारतीय अधिकारी यांच्याशी भेटीमुळे पाकिस्तानचा खोटारडेपणाही उघड झाला. भारतीय अधिकाºयांना जाधव यांना भेटण्याची संमती पाकिस्तानने गुरुवारी दिली. कुलभूषण जाधव स्वत:च्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्टीय न्यायालयात आव्हान देऊ इच्छित नाही, असे पाकिस्तान सांगत होता. पण ते पूर्णपणे खोटे होते आणि जाधव यांना फाशीच्या निकालाविरुद्ध पुनर्विचार याचिका पाकिस्तानने करूच दिली नाही, असे आज स्पष्ट झाले.
पाकिस्तान न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली असून, भारताने या निर्णयाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या न्यायालयाने जाधव यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वा पुनर्विचार याचिका करण्यास सांगितले होते. पण तशी याचिका करण्यास जाधव तयार नाहीत, असे पाकिस्तान सांगत होता . त्यामुळे त्यांना भेटण्याची परवानगी भारताने पाकिस्तानकडे मागितली होती. जाधव व भारतीय अधिकाºयांची आजच भेट झाली.
कुलभूषण जाधव हे नौदलाचे माजी अधिकारी असून, ते कामानिमित्त (पान ७ वर)