केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात 11 नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 09:18 PM2017-09-02T21:18:47+5:302017-09-03T10:06:38+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होणार आहे.  2019 पूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा अखेरचा विस्तार असल्याचे म्हटले जात आहे.  दरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्तारात निर्मला सितारमन, वीरेंद्र कुमार, शंकरभाई वेगाड, के. हरिबाबू, सत्यपाल सिंह यांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Meeting at BJP President Amit Shah's residence in Delhi | केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात 11 नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात 11 नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

Next

नवी दिल्ली, दि. 2 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होणार आहे.  2019 पूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा अखेरचा विस्तार असल्याचे म्हटले जात आहे.  यामध्ये 11 नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर तीन विद्यमान मंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती मिळण्याचीही शक्यता आहे. निर्मला सीतारामन यांना कॅबिनेटपदी बढती मिळणार असल्याचं समजतं आहे. तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांचीही मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती समजते आहे.  थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली.

यांना मंत्रिमंडळात संधी  मिळण्याची शक्यता 
1. अश्विनीकुमार चौबे : पहिल्यांदाच खासदार व बिहारचे आरोग्यमंत्री होते.
2. वीरेंद्र कुमार, लोकसभा खासदार 
3. अनंत कुमार हेगडे, कर्नाटक लोकसभा खासदार
4. गुजरातचे खासदार शंकरभाऊ वेगड राज्यमंत्री होण्याची शक्यता, 
5. राजकुमार सिंग (आर. के. सिंग), आरा बिहार खासदार, माजी गृहसचिव
6. के. हरिबाबू- आंध्र, राज्यमंत्री
7. शिवप्रताप शुक्ला, राज्यमंत्री होण्याची शक्यता, गोरखपूर, उत्तर प्रदेश
8. हरदीप सिंग पुरी, माजी आयएफएस अधिकारी, अलिकडेच भाजपामध्ये केला प्रवेश
9. सत्यपाल सिंग, माजी मुंबई पोलीस आयुक्त 
10. के अल्फोंस- केरळ, माजी आयएएस अधिकारी 
11. गजेंद्रसिंग शेखावत, जोधपूर, राजस्थान



नितीश कुमार म्हणाले, ''मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची माहितीच नाही''

दरम्यान, महिन्याभरापूर्वी लालू प्रसाद यादव यांच्यासोबतची मैत्री तोडून भाजपाशी हातमिळवणी करत बिहारमध्ये सत्ता स्थापन करणारे जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, त्यांना मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत काहीच माहीत नव्हते. मोदींच्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलाबाबतची बातमी त्यांना मीडियाद्वारे मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. जेव्हा पाटणामध्ये त्यांना पत्रकारांनी विचारेल की, तुमच्या पक्षाचाही केंद्रातील सत्तेत समावेश होत आहे? यावर नितीश कुमार यांनी उत्तर दिले की, याबाबत त्यांना कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, नितीश कुमार यांच्या पक्षातील दोन नेत्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होती. 




गडकरींच्या कामावर नरेंद्र मोदी खूश, खातं बदलण्याचा कोणताही विचार नाही - सूत्रांची माहिती

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कामावर प्रचंड खूश असून त्यांचं मंत्रालय कायम ठेवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. रविवारी (3 सप्टेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार होणार असून यावेळी सुरेश प्रभूंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले रेल्वे मंत्रीपद नितीन गडकरी यांना देण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, नितीन गडकरी आपलं खातं समर्थपणे सांभाळत असून मोदींनी घेतलेल्या कामगिरीच्या आढाव्यात नितीन गडकरी पूर्ण गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल रविवारी सकाळी 10 वाजता होणार असून, त्याची सगळी तयारी झाली आहे.    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी रेल्वेसमोरील आव्हाने पूर्ण करण्यासाठी, तसंच खासकरुन रेल्वे सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता नितीन गडकरींकडे हे खातं सोपवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता नितीन गडकरींचं खातं न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

रविवारी केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल करण्यात येणार असून नितीन गडकरींचं नाव यादीत आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याआधी मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यासाठी 'पॉझिटिव्ह' आणि 'निगेटिव्ह' अशा दोन प्रकारात कामाचं विभाजन करण्यात आलं होतं. मोदींच्या या परफॉर्मन्स चार्टमध्ये नितीन गडकरी पहिल्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे नितीन गडकरी यांना स्वत:लाही रेल्वे मंत्रालयाची घेण्यात कोणतंच स्वारस्य नव्हतं.  पक्षाने फक्त कामगिरीचा आढावा न घेता पक्षाने जाहीर केलेल्या योजना, उपलब्धी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कशाप्रकारे काम करण्यात आलं याचीदेखील दखल घेतली आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, सुरेश प्रभू यांना कायम ठेवून गंगा शुद्धीकरण आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. संरक्षण खात्याची जबाबदारी कोणाकडे येईल हे स्पष्ट नाही. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव त्यासाठी घेतले जात आहे. भाजपा सरचिटणीस भूपेंद्र यादव यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असे बोलले जात आहे. मंत्रिमंडळाच्या फेररचनेचा फटका दोन डझन मंत्र्यांना बसण्याची शक्यता आहे.

Web Title: Meeting at BJP President Amit Shah's residence in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा