जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न
By admin | Published: July 7, 2015 01:18 AM2015-07-07T01:18:18+5:302015-07-07T01:18:18+5:30
सोलापूर : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी पोलीस उपायुक्त श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, सहायक आयुक्त समाजकल्याण मनीषा फुले, जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
Next
स लापूर : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी पोलीस उपायुक्त श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, सहायक आयुक्त समाजकल्याण मनीषा फुले, जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीत १ जानेवारी २०१५ ते ३१ मे २०१५ पर्यंतच्या गुन्ांचा आढावा घेण्यात आला. या कालावधीत एकूण ४९ गुन्हे घडले. त्यापैकी ७ गुन्हे शहर विभागातील तर ४२ गुन्हे ग्रामीण विभागातील आहेत. शहर विभागातील ७ पैकी २ गुन्ांची तर ग्रामीण विभागातील ४२ पैकी १६ गुन्ांची निर्गती झाली आहे. उर्वरित गुन्ांच्या तपासाची कार्यवाही सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी शहर व ग्रामीण विभागातील प्रलंबित गुन्ांच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच ३ महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत त्वरित कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले. (प्रतिनिधी)