निवाने येथे मराठा समाजाची बैठक संपन्न

By Admin | Published: September 20, 2016 10:52 PM2016-09-20T22:52:27+5:302016-09-20T23:52:22+5:30

Meeting of Maratha Community at Navana | निवाने येथे मराठा समाजाची बैठक संपन्न

निवाने येथे मराठा समाजाची बैठक संपन्न

googlenewsNext


निवाने : नाशिक येथे २४ सप्टेंबर रोजी होणार्‍या मराठा क्रांती मुक मार्चाच्या नियोजनासाठी कळवण तालुक्यातील निवाने येथील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात मराठा समाजाची बैठक संपन्न झाली.
प्रारंभी कोपर्डी घटनेतील बलिकेस उरी येथील शहीद झालेल्या जवानांना सामूहिक श्रांद्धान्जली अर्पण करण्यात आली . या प्रसंगी कारभारी आहेर ,रवींद्र देवरे आदीनी उपस्थित समाज बांधवाना मार्गदर्शन केले . त्यात नाशिक येथे पंचवीस लाखापेक्षा जास्त मराठा समाज बांधव एकत्र येणार असून या मोर्चास कुठलेही गालबोट लागणार नाही याची सर्व जणांनी खबरदारी घ्यावी असे सांगून निवणेसह पंचक्र ोशीतील जास्तीत जास्त पुरु ष, महिला, व तरूणांनी सहभाग घेण्यासाठी नियोजन करण्यात आले. निवाने व परिसरातील प्रत्येक भागाची जबाबदार तरु णांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. बैठकीत विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली .
निवाने येथे झालेल्या बैठकीत कारभारी आहेर, रवींद्र देवरे, हिरामण पगार, जितेंद्र पगार, जितेंद्र वाघ , गोविंद पगार, हेमंत पाटील, दिपक गांगुर्ड, शरद पाटील, विलास रौंदळ, गौरव पगार, अशोक आहेर,बाळकृष्ण आहेर,निंबा आहेर,भालचंद्र आहेर,जीभाऊ आहेर,संदीप पाटील,समाधान आहेर, घनश्याम आहेर,अनिल आहेर, संजय देवरे, दिनकर आहेर, मुन्ना आहेर, विनायक आहेर, शिवाजी आहेर, दिलीप आहेर आदींसह परिसरातील नागरीक व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (फोटो २० निवाने )
फोटो - मराठा समाजच्या बैठकीत मार्गदर्शन करताना कारभारी आहेर व उपस्थित समाज बांधव )

Web Title: Meeting of Maratha Community at Navana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.