योग्य पर्याय देऊनच स्थलांतर गटनेता बैठक: महासभेत होणार शिक्कामोर्तब

By admin | Published: January 12, 2016 11:16 PM2016-01-12T23:16:11+5:302016-01-12T23:16:11+5:30

जळगाव : अतिक्रमणे काढण्यापूर्वीच अतिक्रमण धारकास योग्य व सोयीची ठरेल अशी जागा दिली जावी मगच कारवाई केली जावी असा महत्त्वपूर्ण निर्णय गटनेता बैठकीत मंगळवारी झाला. निि›त केलेल्या जागांवर येत्या १९ जानेवारी रोजी होणार्‍या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे.

Meeting with migration group will give a right choice: the general meeting will be held in the General Assembly | योग्य पर्याय देऊनच स्थलांतर गटनेता बैठक: महासभेत होणार शिक्कामोर्तब

योग्य पर्याय देऊनच स्थलांतर गटनेता बैठक: महासभेत होणार शिक्कामोर्तब

Next
गाव : अतिक्रमणे काढण्यापूर्वीच अतिक्रमण धारकास योग्य व सोयीची ठरेल अशी जागा दिली जावी मगच कारवाई केली जावी असा महत्त्वपूर्ण निर्णय गटनेता बैठकीत मंगळवारी झाला. निि›त केलेल्या जागांवर येत्या १९ जानेवारी रोजी होणार्‍या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे.
महापालिकेने हॉकर्स स्थलांतराच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत या संदर्भात निर्णय झाला होता. मनपा अतिक्रमण विगाकडून हॉकर्स झोन निि›तीसाठी नकाशे तयार करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नितीन ल‹ा यांच्या कार्यालयात गटनेत्यांची बैठक आयोजिण्यात आली होती.
विविध मुद्यांवर चर्चा
अतिक्रमण काढताना एकदम निर्णय घेऊन कारवाई केली जाते. यापुढे ही पद्धती न वापरता ज्या भागातील अतिक्रमणे काढायची त्या हॉकर्सला पर्याय जागा फार दूरची न देता सोयीच्या ठिकाणी दिली जावी यावर सकारात्मक चर्चा बैठकीत झाली. उपमहापौर सुनील महाजन, स्थायी सभापती नितीन बरडे, नितीन ल‹ा, शामकांत सोनवणे, मनसेचे बंटी जोशी, सुरेश सोनवणे, सुनील पाटील, अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम. खान आदी यावेळी उपस्थित होते.
शहरातील सुभाष चौक, घाणेकर चौक, बळीराम पेठ भाजीबाजार, शिवाजी चौक, फुले मार्केटच्या आजुबाजुला बसणारे हॉकर्स, टॉवर चौक, गणेश कॉलनी, गोविंद रिक्षा स्टॉप या परिसरात हॉकर्स विविध वस्तू, फळे, भाजी विक्रीसाठी बसतात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे प्राधान्याने काढावयाची आहेत. त्यानुसार क्रम ठरवून टप्प्याटप्प्याने ही अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.
अशा आहेत पर्यायी जागा
मनपाची जुनी इमारतीची जागा, त्याजवळील बोळ, कबुतरखाना परिसर, जैन मंदिरामागील जागा, गोलाणी मार्केटमधील रिकामे असलेले ओटे या ठिकाणी बरेचे हॉकर्स बसू शकतात. बळीराम पेठ ते फुले मार्केटमध्ये व्यवसाय करणार्‍यांना ही जागाही दूरची नसेल या दृष्टीने आता नियोजन केले जावे असे यावेळी ठरविण्यात आले. महापालिकेची येत्या १९ रोजी महासभा आहे. या सभेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करून घ्यावे असे बैठकीत ठरविण्यात आले.

Web Title: Meeting with migration group will give a right choice: the general meeting will be held in the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.