"मुस्लिम समाजाबाबत चुकीची विधानं करू नका", पंतप्रधान मोदींचा BJP नेत्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 06:54 PM2023-01-17T18:54:19+5:302023-01-17T18:55:38+5:30

भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा नेत्यांना संबोधित केलं.

meeting of bjp national executive pm narendra modi said to start preparing for the elections | "मुस्लिम समाजाबाबत चुकीची विधानं करू नका", पंतप्रधान मोदींचा BJP नेत्यांना सल्ला

"मुस्लिम समाजाबाबत चुकीची विधानं करू नका", पंतप्रधान मोदींचा BJP नेत्यांना सल्ला

googlenewsNext

नवी दिल्ली-

भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा नेत्यांना संबोधित केलं. यात पंतप्रधानांनी भाजपा नेत्यांना मुस्लिम समाजाबाबत विचारपूर्वक विधान करण्याचा सल्ला दिला आहे. "मुस्लिम समाजाबाबत चुकीची विधानं अजिबात करू नका. भारत सध्या सर्वोत्तम काळाचा अनुभव घेत आहे आणि अशात आपण मेहनतीच्याबाबत कुठेच मागे पडता कामा नये. प्रयत्नांची पराकाष्ठा करा. विविध ठिकाणी जाऊन लोकांना भेटा. राष्ट्रवादाची ज्योत प्रत्येक ठिकाणी तेवत राहिली पाहिजे", असं मोदी म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भाजपा नेत्यांना देशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही तयारी करण्यास सांगितलं. "संपूर्ण ताकदीनं निवडणुकीच्या तयारीला लागा. मेहनतीच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडता कामा नये. भाजपा आता फक्त राजकीय आंदोलन नव्हे, तर सामाजिक आंदोलनात बदललं गेलं पाहिजे. अमृतकाळाचे परिवर्तन कर्तव्यकाळात करायला हवं. आता सामाजिक पातळीवर आपली भूमिका खूप महत्वाची आहे", असं मोदी म्हणाले. 

पंतप्रधान मोदींनी यावेळी कार्यकर्त्यांना एक टास्क देखील दिलं आहे. "सीमेलगतच्या गावांमध्ये संघटन आणखी मजबूत करायला हवं. निवडणुकीला अजूनही ४०० दिवस बाकी आहेत आणि आपल्याला पूर्ण ताकदीनं प्रयत्न सुरू करायला हवेत", असं मोदी म्हणाले. 

युवा पीढीपर्यंत संदेश पोहोचला पाहिजे
१८ ते २५ वयोगटातील युवांना भारताच्या राजकीय इतिहासाला जवळून पाहिलेलं नाही. याआधीच्या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि चुकीच्या कामांची माहिती त्यांना नाही. यासाठी आपण त्यांना जागरुक करणं आणि भाजपाच्या सुशासनाची माहिती देणं गरजेचं आहे. ज्यापद्धतीनं आपण बेटी बचाओ अभियान यशस्वी केलं त्याचपद्धतीनं आपल्याला आता धरती बचाओ अभियान चालवावं लागणार आहे, असं मोदी म्हणाले. 

Web Title: meeting of bjp national executive pm narendra modi said to start preparing for the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.