सभेचे आयोजन व उत्कृष्ट नियोजन ढोल पथकाने वेधले लक्ष : पार्किंगच्या ठिकाणीच दिली जेवणाची पाकिटे

By Admin | Published: January 26, 2016 12:05 AM2016-01-26T00:05:21+5:302016-01-26T00:05:21+5:30

जळगाव : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित होणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिला समारंभाला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती असताना उत्कृष्ट नियोजनाचा अनुभव आला.

Meeting organized and organized by the drum squad: The dining table at the parking lot | सभेचे आयोजन व उत्कृष्ट नियोजन ढोल पथकाने वेधले लक्ष : पार्किंगच्या ठिकाणीच दिली जेवणाची पाकिटे

सभेचे आयोजन व उत्कृष्ट नियोजन ढोल पथकाने वेधले लक्ष : पार्किंगच्या ठिकाणीच दिली जेवणाची पाकिटे

googlenewsNext
गाव : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित होणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिला समारंभाला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती असताना उत्कृष्ट नियोजनाचा अनुभव आला.

कार्यकर्त्यांसाठी पाण्याचे जार
जळगाव शहरातील पाण्याची टंचाई लक्षात घेता कार्यकर्त्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी सभेच्या तिन्ही बाजूला पाण्याचे जार उपलब्ध करून देण्यात आले होते. यासह गर्दीचे नियोजन करण्यासाठी कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी फिरत होते.

महिला व आदिवासी ढोल पथकाने वेधले लक्ष
सभेच्या ठिकाणी मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी आयोजकांनी महिला ढोलपथक बोलविले होते. या पथकाकडून वाजविण्यात येणारे ढोल उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच रावेर व यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांचे ढोल पथक सभेच्या ठिकाणी दाखल झाले होते. या आदिवासी पथकातील काही सदस्यांनी आदिवासी नृत्य सादर केले.

फोटोग्राफरची धडपड आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ
महसूलमंत्री एकनाथराव खडसे तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणाने सभेत रंगत आणली. भाषण सुरू असताना प्रसार माध्यमाचे फोटोग्राफर धडपड करीत असल्याने खाली बसलेल्या कार्यकर्त्यांना दिसत नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी फोटोग्राफर यांना खाली बसविण्यासाठी गोंधळ सुरू केला. त्यानंतर एकनाथराव खडसे यांनी फोटोग्राफर यांना डी-झोनमध्ये आणण्याची पोलिसांना सूचना केली.

पार्किंगसाठी ठिकठिकाणी व्यवस्था
सभेला होणारी गर्दी लक्षात घेता आणि रहदारीची समस्या लक्षात घेऊन सभेपासून काही अंतरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, बहिणाबाई चौक, महेश प्रगती हॉलजवळील मोकळ्या मैदानात चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.

ठिकठिकाणी जेवणाचे पाकीट
सभेला जिल्हाभरातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दिली. बाहेरगावावरून आलेल्या कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी अग्रवाल हॉस्पिटल, आस्वाद चौक, महेश प्रगती हॉल येथे जेवणाचे पाकीट उपलब्ध करून दिले होते. जेवणासाठी भाजपा युवा मोर्चाचे चेतन शर्मा, रितेश लिमडा, सागर पाटील, विशाल त्रिपाठी, नितीन गायकवाड, कैलास सोमाणी, गणेश माळी यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती.

Web Title: Meeting organized and organized by the drum squad: The dining table at the parking lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.