चाकुरात झाली एकच बैठक दुष्काळासाठी आमदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

By admin | Published: September 16, 2015 11:37 PM2015-09-16T23:37:58+5:302015-09-17T00:29:42+5:30

संदीप अंकलकोटे, चाकूर : दुष्काळी परिस्थितीत आपल्या लोकप्रतिनिधींनी किमान समस्यांची चौकशी करुन त्या सोडविण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना करण्याची सर्वसामान्यांची अपेक्षा असते़ परंतु, तालुक्यातील एकाही जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती सदस्याने चौकशी केली नाही़ आमदारांनी एक बैठक घेऊन सूचना केल्या आहेत़

A meeting took place in the chair and the Chief Minister visited the meeting for drought | चाकुरात झाली एकच बैठक दुष्काळासाठी आमदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

चाकुरात झाली एकच बैठक दुष्काळासाठी आमदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Next

संदीप अंकलकोटे, चाकूर : दुष्काळी परिस्थितीत आपल्या लोकप्रतिनिधींनी किमान समस्यांची चौकशी करुन त्या सोडविण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना करण्याची सर्वसामान्यांची अपेक्षा असते़ परंतु, तालुक्यातील एकाही जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती सदस्याने चौकशी केली नाही़ आमदारांनी एक बैठक घेऊन सूचना केल्या आहेत़
चाकूर तालुक्याचा अहमदपूर विधानसभा मतदारसंघात समावेश आहे़ विद्यमान आमदार विनायकराव पाटील आहेत़ चाकूरची ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा मिळाल्याने तेथे प्रशासक आहेत़ तालुक्यात जिल्हा परिषदेचे ६, तर पंचायत समितीचे १२ सदस्य आहेत़ तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूरांना मदत देण्याचे काम एकाही सदस्याने केले नसल्याचे पहावयास मिळत आहे़ आमदार पाटील यांनी अधिकार्‍यांची एक बैठक घेऊन सूचना केल्या आहेत़ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी केली आहे़ शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळावी़ मजुरांना कामे मिळावीत ही मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे़
चौकट़़़
आत्महत्याग्रस्त १३ शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना सामाजिक कार्येकर्ते, प्राचार्य संघटनेच्या वतीने चार दिवसांपूर्वीच आर्थिक मदत देण्यात आली आहे़ समाजातील नागरिकांकडूनच होत आहे़ याउलट जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती सदस्यांकडून मोफत पाणीपुरवठाही उपलब्ध करुन दिला जात नसल्याचे दिसून येत आहे़

Web Title: A meeting took place in the chair and the Chief Minister visited the meeting for drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.