दिल्लीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची झाली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 08:28 PM2018-01-29T20:28:52+5:302018-01-29T20:29:16+5:30
मोदी सरकारविरोधात विरोधकांनी जोरदार रणशिंग फुंकलं असून, त्यांच्या विरोधात अनेक पक्ष एकत्र आले आहेत. मुंबईतल्या संविधान रॅलीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले होते. राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी विरोधकांची मूठ बांधत स्वतःच्या निवासस्थानी बैठकही घेतली आहे.
नवी दिल्ली - मोदी सरकारविरोधात विरोधकांनी जोरदार रणशिंग फुंकलं असून, त्यांच्या विरोधात अनेक पक्ष एकत्र आले आहेत. मुंबईतल्या संविधान रॅलीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले होते. राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी विरोधकांची मूठ बांधत स्वतःच्या निवासस्थानी बैठकही घेतली आहे.
पवारांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत काँग्रेस नेते आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद, माकप नेते टी. के. रंगराजन, डी. राजा, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, जनता दलाचे शरद यादव, माजिद मेमन, डी. पी. त्रिपाठी, तारीक अन्वर हजर होते. या बैठकीत विरोधी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशन व राजकीय मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढची बैठक सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाणार आहे.
दुसरीकडे गेल्या काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांनी भाजपाविरोधी संविधान बचाव रॅलीही काढली होती. या रॅलीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया अशी ही रॅली काढण्यात आली होती. आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली असून, रॅलीमध्ये कोणल्याही प्रकारची घोषणाबाजी केली जात नाहीये. घोषणाबाजी न करता विरोधकांनी मूक रॅली काढली आहे. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, खासदार राजीव सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आदी नेते या रॅलीत सहभागी झाले होते. याशिवाय हार्दिक पटेल, शरद यादव, ओमर अब्दुल्ला, सीताराम येचुरी यांच्यासारखे राष्ट्रीय स्तरावरील नेतेही रॅलीत सहभागी झाले होते.