मेहरूण तलावाच्या घाटाचे काम लागणार मार्गी २४ रोजी होणार सभा : १ कोटीचे अंदाजपत्रक महासभेपुढे ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2015 12:09 AM2015-11-19T00:09:35+5:302015-11-19T00:09:35+5:30

जळगाव : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मेहरूण तलाव परिसरात रस्ते, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन व सुशोभिकरण करण्यासाठी महापालिकेने ९९ लाख ५२ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून २४ रोजी होणार्‍या महासभेपुढे अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवणार आहे. महापालिकेची महासभा ही २४ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. तत्पूर्वी गेल्या वेळी तहकूब झालेली महासभा सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे.

The meeting will be held on 24th March for the Meherun Lake Ghat: 1 crore budget to be held by the Mahasabha | मेहरूण तलावाच्या घाटाचे काम लागणार मार्गी २४ रोजी होणार सभा : १ कोटीचे अंदाजपत्रक महासभेपुढे ठेवणार

मेहरूण तलावाच्या घाटाचे काम लागणार मार्गी २४ रोजी होणार सभा : १ कोटीचे अंदाजपत्रक महासभेपुढे ठेवणार

Next
गाव : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मेहरूण तलाव परिसरात रस्ते, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन व सुशोभिकरण करण्यासाठी महापालिकेने ९९ लाख ५२ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून २४ रोजी होणार्‍या महासभेपुढे अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवणार आहे. महापालिकेची महासभा ही २४ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. तत्पूर्वी गेल्या वेळी तहकूब झालेली महासभा सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे.
प्रशासकीय मान्यता मिळाली
मेहरूणच्या सुशोभिकरणासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यानुसार प्रशासनातर्फे ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली असता सुशीलकुमार गणपत डोंगरे यांनी सर्वात कमी दराच्या निविदाला स्थायी समितीत ठराव करून मान्यता घेण्यात आली आहे. त्यानुसार मेहरूणच्या लौकिकात भर पाडण्यासाठी आता प्रशासनातर्फे सुशोभिकरण केले जाणार असून त्यासाठी ९९ लाख ५० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

महासभेच्या अजेंड्यावरील विषय असे :
० शहराच्या मंजूर विकास योजनेमध्ये मौजे पिंप्राळा शिवार गट नंबर २७७/१/१ या जमिनीवर आरक्षण क्रमांक ९२ गार्डनचे पार्किंगचे क्षेत्र भूसंपादनाबाबत प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे.
० अंध, अपंगांना निवासासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे.
० आस्थापनातील विविध संवर्गातील रिक्त पदे एकत्रित वेतनावर भरण्याबाबत धोरण ठरविण्यासाठी प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे.
० शिवाजीनगर मधील मारूती मंदिर व पिरबाबा दर्गा जवळील चौकाला स‘ाद्री चौक व भुरे मामलेदार प्लॉट येथील असलेल्या बगीच्यास छत्रपती संभाजी राजे उद्यान असे नाव देण्याबाबत आलेल्या अर्जावर निर्णय घेणे. याबरोबरच अशासकीय प्रस्तावावर महासभेत चर्चा केली जाणार आहे.

Web Title: The meeting will be held on 24th March for the Meherun Lake Ghat: 1 crore budget to be held by the Mahasabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.