Yogi Adityanath: मेगा इव्हेंट! योगींच्या शपथविधीला अदानी, अंबानी, १२ मुख्यमंत्री अन् ४९ कंपन्यांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 11:22 AM2022-03-24T11:22:12+5:302022-03-24T11:23:00+5:30

भाजपकडून हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली असून, २०० व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी करण्यात आली आहे.

mega event of yogi adityanath oath ceremony 49 companies invited ambani and adani will be also present | Yogi Adityanath: मेगा इव्हेंट! योगींच्या शपथविधीला अदानी, अंबानी, १२ मुख्यमंत्री अन् ४९ कंपन्यांना निमंत्रण

Yogi Adityanath: मेगा इव्हेंट! योगींच्या शपथविधीला अदानी, अंबानी, १२ मुख्यमंत्री अन् ४९ कंपन्यांना निमंत्रण

Next

लखनऊ:उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये (UP Election 2022) भाजपला प्रचंड यश मिळाले. यानंतर पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथबद्ध होणार आहे. दुसऱ्यांदा युपीचा गड राखल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण असून, योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीचा मेगा इव्हेंट होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. योगी आदित्यनाथ २५ मार्च रोजी लखनऊच्या एकना इंटरनॅशनल स्टेडियमवर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात १२ राज्यांचे मुख्यमंत्री आणि पाच उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.

योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्याशिवाय विविध मठ आणि मंदिरांचे महंतही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आघाडीचे उद्योगपती आणि ४९ कंपन्यांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये टाटा ग्रुपचे एन. चंद्रशेखरन, अंबानी ग्रुपचे नीरज अंबानी, महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा, बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला आणि अदानी ग्रुपचे गौतम अदानी यांचाही समावेश असेल. 

२०० व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार

मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, उत्तराखंड, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी २०० व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, मुलायम सिंह यादव, बसपा सुप्रीमो मायावती यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे.

ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याचा भाजपचा घाट

शपथविधी सोहळा ऐतिहासिक करण्याचा भाजपची योजना आहे. शपथविधी सोहळ्याला जाणाऱ्यांनी आपल्या वाहनांवर पक्षाचा झेंडा लावावा, असे सांगण्यात आले आहे. येणाऱ्या लोकांसाठी निमंत्रण पत्रिका तयार करण्याची व्यवस्था असेल, जी जिल्हास्तरावरच उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगितले जात आहे. शपथविधी सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. समारंभाच्या ठिकाणाजवळ ड्रोनद्वारे पाळत ठेवण्यात येणार आहे. एटीएस कमांडो स्टेडियमभोवती तैनात असतील आणि सशस्त्र पोलिस उंच इमारतींवर तैनात असतील. ६० हजारांहून अधिक गर्दीचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. मात्र, भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता हा आकडा अंदाजापेक्षा जास्त असू शकतो.
 

Web Title: mega event of yogi adityanath oath ceremony 49 companies invited ambani and adani will be also present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.