Satyapal Malik: “पुन्हा PM मोदींना भेटायची हिंमत झाली नाही”; सत्यपाल मलिकांनी सांगितली ‘मन की बात’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 09:10 AM2022-01-04T09:10:19+5:302022-01-04T09:11:37+5:30

Satyapal Malik: सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीनंतरचा घटनाक्रम सांगितला.

meghalaya governor satyapal malik reaction on controversial statement over pm narendra modi | Satyapal Malik: “पुन्हा PM मोदींना भेटायची हिंमत झाली नाही”; सत्यपाल मलिकांनी सांगितली ‘मन की बात’

Satyapal Malik: “पुन्हा PM मोदींना भेटायची हिंमत झाली नाही”; सत्यपाल मलिकांनी सांगितली ‘मन की बात’

Next

नवी दिल्ली: शेतकऱ्यांचे आंदोलन वर्षभर सुरु होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (PM Narendra Modi) माझी भेट झाली तेव्हा ते खूप अहंकारात होते. ५ मिनिटांत माझ्यात आणि त्यांच्यात वाद झाला.  ते खूप गर्विष्ठ आहेत. जेव्हा मी त्यांना सांगितले आमचे ५०० जण मृत्यू पावलेत तेव्हा माझ्यासाठी मेलेत का? असा प्रश्न त्यांनी केला, असे खळबळजनक विधान मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केल्यानंतर पुन्हा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. मात्र, या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा भेटण्याची हिंमत झाली नाही, असे म्हटले आहे. 

यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्यपाल मलिक यांनी या भेटीनंतर काय झाले, त्याविषयी सांगितले. मी नेहमीच पंतप्रधानांचे म्हणणे, विचार जनतेपर्यंत पोहोचवत आलोय. जेव्हा मी त्यांना भेटलो. तेव्हा ते खूप हट्टीपणा दाखवत होते. पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून मी अमित शाह यांना भेटलो. अमित शाह पंतप्रधान मोदींचा खूप सन्मान आणि आदर करतात, असे सत्यपाल मलिक यांनी सांगितले. 

एका मिनिटात राज्यपालपद सोडतो

पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत झालेल्या प्रकारानंतर पुन्हा त्यांना भेटायची माझी हिंमत झाली नाही. तुम्ही आमच्यासाठी योग्य व्यक्ती नाही, असे मला सांगितले असते, तर एका मिनिटात राज्यपालपद सोडले असते. तशी मनाची तयारी मी केली होती, असे सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केले. भाजप नेत्यांचे गावागावांमध्ये जाणे कठीण झाले होते. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात कोणताही मंत्री जाऊ शकत नव्हता. तेथील जनता पंतप्रधानांचा खूप आदर करते, ही बाब वेगळी आहे. मात्र, हरियाणामध्ये तर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरू दिले नाही. 

दरम्यान, पंतप्रधान जे काही बोलले त्यावर आणखी काय बोलायचं? आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. MSP कायद्यासाठी त्यांची मदत हवी.  अद्यापही अनेक निर्णय प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांविरोधातील गुन्हे सरकारने मागे घेतले पाहिजेत. MSP वर कायदा बनवण्याची गरज आहे, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: meghalaya governor satyapal malik reaction on controversial statement over pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.