Mehbooba Mufti Amit Shah: "जम्मूमध्ये एकही सक्षम हिंदू शिल्लक नाहीये का?" मेहबुबा मुफ्तींचा अमित शाहांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 05:36 PM2022-10-09T17:36:55+5:302022-10-09T17:37:21+5:30

अमित शाहांच्या जम्मू दौऱ्याचा मुफ्तींनी घेतला समाचार

Mehbooba Mufti asks Amit Shah weather there is not a capable Hindu left in Jammu | Mehbooba Mufti Amit Shah: "जम्मूमध्ये एकही सक्षम हिंदू शिल्लक नाहीये का?" मेहबुबा मुफ्तींचा अमित शाहांना सवाल

Mehbooba Mufti Amit Shah: "जम्मूमध्ये एकही सक्षम हिंदू शिल्लक नाहीये का?" मेहबुबा मुफ्तींचा अमित शाहांना सवाल

Next

Mehbooba Mufti Amit Shah, Jammu and Kashmir: गृहमंत्री अमित शाह नुकतेच जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावरून दिल्लीला परतले. त्यांनी काश्मीरमध्ये काही सभा घेतल्या आणि आपले विचार मांडले. पण जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आता शाह यांच्या दौऱ्यादरम्यान केलेल्या भाषणांवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी रविवारी जम्मू दौऱ्यावर एका सभेला संबोधित करताना याबाबत काही सवाल केले. या वेळी त्यांनी पीडीपीमध्ये नव्याने दाखल झालेल्या युवकांचे अभिनंदन करत त्यांना चांगल्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याशिवाय, जम्मू काश्मीरमध्ये हिंदूंची संख्या कमी आहे का? असा सवालही त्यांनी अमित शाह यांना केला.

मेहबुबा म्हणाल्या की, आमच्या पक्षासाठी जम्मूमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार. 'पीडीपी'मध्ये सामील होऊन जम्मूमध्ये काम करणे खूप अवघड आहे, कारण काही शक्तींनी आमची प्रतिमा डागाळली आहे. पण माझे बालपण जम्मूमध्येच गेले. मला जम्मूच्या लोकांचे खूप वाईट वाटते. त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. माझे वडील मुफ्ती सईद यांनी केवळ जम्मूच्या फायद्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हातमिळवणी केली होती. पण पुढे काय घडलं ते सगळ्यांनीच पाहिलं.

"अलिकडेच अमित शाह जम्मू-काश्मीरमध्ये आले होते. ते म्हणाले की जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आले आहे. आता ते हिंदू व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर विराजमान होईल. मी त्यांना विचारू इच्छिते की त्यांनी जम्मूतील माणसाला लेफ्टनंट गव्हर्नर का केले नाही? त्यांनी यूपी, बिहारमधून व्यक्तींची निवड का केली? जम्मूमध्ये एकही हिंदू शिल्लक नाहीये का? की जे हिंदू आहेत ते लेफ्टनंट गव्हर्नर किंवा मुख्य सचिव होण्यास सक्षम नाहीत असे वाटते का? J&K बँकेचे चेअरमन देखील J&K बाहेरचे आहेत? भाजपा किमान डॉ. करण सिंग यांना जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल बनवू शकलेच असते", अशा खरमरीत सवालांची सरबत्ती त्यांनी अमित शाह यांच्यावर केली.

"गृहमंत्री काश्मीरमध्ये सामान्य परिस्थिती असल्याचे ढोल वाजवून सांगत फिरत आहेत. पण मला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मला माझ्या एका कार्यकर्त्याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी पट्टनला जायचे होते, पण मला जाऊ दिले नाही. एखाद्या माजी मुख्यमंत्र्यांचे मूलभूत अधिकार इतक्या सहजतेने चिरडले जात असतील, तर सर्वसामान्यांच्या दुरवस्थेची कल्पनाही करताच येऊ शकत नाही", अशी टीकाही त्यांनी अमित शाह यांच्यावर केली.

Web Title: Mehbooba Mufti asks Amit Shah weather there is not a capable Hindu left in Jammu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.