"तरुणांना नोकरी न मिळाल्यास त्यांच्याकडे शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 03:44 PM2020-11-09T15:44:13+5:302020-11-09T15:47:17+5:30

Mehbooba Mufti : केंद्र सरकारवर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे.

mehbooba mufti attacks bjp over bihar elections compliments tejaswi yadav | "तरुणांना नोकरी न मिळाल्यास त्यांच्याकडे शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही"

"तरुणांना नोकरी न मिळाल्यास त्यांच्याकडे शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही"

Next

श्रीनगर - पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या आणि जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलं आहे. केंद्र सरकारवर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. "तरुणांना नोकरी मिळाली नाही तर त्यांच्याकडे शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही" असं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी बिहारमधील निवडणुकवर देखल भाष्य केलं आहे. 

"मी तेजस्वी यादव यांचे अभिनंदन करू इच्छिते कारण इतके लहान असूनही त्यांनी बिहारमध्ये अन्न, वस्त्र, रोजगार, निवारा आणि कलम 370, 35 अ , जमीन खरेदी चालू दिले नाही. आज यांची वेळ आहे. उद्या आपल्या सर्वांची वेळ येईल. अमेरिकेत ट्रम्प यांच्यासोबत जे झालं तेच यांच्यासोबत देखील होणार आहे" असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे. तसेच कलम 370 हटवल्यानंतर भाजपा सरकारने जम्मूमधील परिस्थिती खराब केली आहे. 

जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील लोकांची जमीन आणि नोकरीचा अधिकार हिरावून घेतला आहे असं देखील म्हटलं आहे. तसेच भारत जर चीनशी चर्चा करू शकतो, तर मग पाकिस्तानशी का करू शकत नाही, असं देखील मुफ्ती यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी मेहबुबा मुफ्ती यांनी तिरंग्याबाबत केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. 

आम्हाला आमचा जम्मू-काश्मीर ध्वज परत मिळेपर्यंत तिरंगा ध्वज हाती धरणार नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. "आम्ही कलम 370 पुन्हा आणणारच आणि असे होईपर्यंत मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. यासोबतच मेहबुबा यांनी भारताच्या राष्ट्रीय ध्वजाबद्दल अपमानास्पद भाष्य केलं. जेव्हा आमचा जम्मू काश्मीरचा झेंडा परत येईल तेव्हाच आम्ही तो (तिरंगा) ध्वजही घेऊ. तो ध्वज आमच्या आयुष्याचा एक भाग आहे, तो आमचा ध्वज आहे. या ध्वजासोबत आमचं नातं आहे" असं मेहबुबा म्हणाल्या होत्या.

Web Title: mehbooba mufti attacks bjp over bihar elections compliments tejaswi yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.