जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री बनणार मेहबूबा मुफ्ती ?
By admin | Published: January 4, 2016 10:14 AM2016-01-04T10:14:41+5:302016-01-04T13:13:09+5:30
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद आजारी असल्यामुळे त्यांची कन्या मेहबूबा मुफ्ती यांची जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ४ - जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद आजारी असल्यामुळे त्यांची कन्या मेहबूबा मुफ्ती यांची जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'सत्ता हस्तांतरण हा पीडीपीचा अंतर्गत निर्णय असून मुफ्ती यांच्या नियुक्तीला भाजपाचा विरोध नसेल' असे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे आरोग्यमंत्री व भाजपाचे वरिष्ठ नेते चौधरी लाल सिंह यांनी केले आहे. त्यामुळे मुफ्ती यांची मुख्यमंत्रीपदी लवकरच बिनविरोध नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी ७९ वर्षीय मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या छातीत वेदना होऊन श्वसनास त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासांठी तातडीने दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना सध्या कृत्रिमरित्या ऑक्सिजन देण्यात येत आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी गंभीर आहे. त्यामुळे त्यांना सध्या राज्याचे नेतृत्व करणे शक्य नसून त्यांची कन्या मेहबूबा मुफ्ती यांची राज्याचे नेतृत्व करण्यासाठी निवड होऊ शकते.