मेहबूबा मुफ्तींनी घेतली जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

By admin | Published: April 4, 2016 11:04 AM2016-04-04T11:04:05+5:302016-04-04T11:19:48+5:30

पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या.

Mehbooba Mufti sworn in as Jammu and Kashmir's Chief Minister | मेहबूबा मुफ्तींनी घेतली जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

मेहबूबा मुफ्तींनी घेतली जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Next
ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. ४ - पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. राज्यपाल एन.एन.व्होरा यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी काश्मीरमधील पीडीपीचे साथीदार असलेल्या भाजपाचे नेते राम माधव यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्लाही उपस्थित होते.
मेहबूबा मुफ्ती या देशातील दुस-या महिला मुस्लिम मुख्यमंत्री बनल्या आहेत.  याआधी ६ डिसेंबर १९८० रोजी सईदा अन्वरा तायमूर यांना देशातील पहिल्या मुस्लिम मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला होता. त्या ३० जून १९८१ पर्यंत आसामच्या मुख्यमंत्रिपदी होत्या.
मेहबूबा मुफ्ती यांच्यासह आघाडीचे १६ कॅबिनेट व ८ राज्यमंत्र्यानी पदाची शपथ घेतली, त्यातील भाजपाच्या दोन मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. 
जानेवारी महिन्यात जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन झाल्यानंतर राज्याची धुरा सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या दोन महिन्याहून अधिक काळ याप्रकरणी भाजपा-पीडीपीत चर्चा सुरू होती. अखेर मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Mehbooba Mufti sworn in as Jammu and Kashmir's Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.