चोक्सीला डोमिनिकातून थेट भारतात पाठवणार; अँटिगुआ, बर्बुडाच्या मंत्रिमंडळाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 07:51 AM2021-06-04T07:51:35+5:302021-06-04T07:52:43+5:30

चोक्सी हा आता डोमिनिकाचा ‘प्रश्न’ असून तो जर अँटिगुआ आणि बर्बुडाला परत आला, तर प्रश्न पूर्वस्थितीत येईल, असे मानले गेले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान गॅस्टोन ब्राऊनी होते. 

mehul Choksi will be sent directly to India from Dominica | चोक्सीला डोमिनिकातून थेट भारतात पाठवणार; अँटिगुआ, बर्बुडाच्या मंत्रिमंडळाचा निर्णय

चोक्सीला डोमिनिकातून थेट भारतात पाठवणार; अँटिगुआ, बर्बुडाच्या मंत्रिमंडळाचा निर्णय

Next

नवी दिल्ली : फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला डोमिनिकातून थेट भारतात पाठविण्याचा निर्णय अँटिगुआ आणि बर्बुडाच्या मंत्रिमंडळाने बैठकीत घेतला, असे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले. मेहुल चोक्सी हा पंजाब अँड नॅशनल बँकेचे १३,५०० कोटी रुपयांचे कर्ज न फेडता फरार झाल्याबद्दल हवा आहे. 

मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत चोक्सी प्रकरणावर चर्चा झाली. चोक्सी हा आता डोमिनिकाचा ‘प्रश्न’ असून तो जर अँटिगुआ आणि बर्बुडाला परत आला, तर प्रश्न पूर्वस्थितीत येईल, असे मानले गेले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान गॅस्टोन ब्राऊनी होते. 

अँटिगुआतून चोक्सीला पाठवायची वेळ आल्यास कायदा राबवणारे अधिकारी गुप्त माहिती मिळवणे सुरूच ठेवतील, असे ठरले. चोक्सीला डोमिनिकातून भारतात पाठवण्यास अँटिगुआ आणि बर्बुडाच्या मंत्रिमंडळाचे प्राधान्य आहे, असे बैठकीच्या टिपणांत म्हटले आहे. 

आमचे सर्व प्रयत्न सुरू
फरार लोकांना भारतात परत आणण्यासाठी आमचा निर्धार ठाम असून मेहुल चोक्सी याला देशात परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू ठेवले जातील, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची वार्ताहरांशी ऑनलाईन बोलताना म्हणाले. 

Web Title: mehul Choksi will be sent directly to India from Dominica

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.