मेळघाट ते कारगिल... काश्मीर खोऱ्यात जिल्हाधिकारीपदी मराठामोळे संतोष सुखदेवे
By महेश गलांडे | Published: February 25, 2021 09:41 PM2021-02-25T21:41:16+5:302021-02-25T21:43:59+5:30
जम्मू आणि काश्मीर कॅडेरच्या 2017 च्या बॅचचे अधिकारी संतोष सुखदेवे यापूर्वी उपजिल्हाधिकारी म्हणून माहोरेच्या अतरिक्त प्रभारी म्हणून काम पाहिलं आहे
मुंबई - संतोष सुखदेवे यांनी कारगिलच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी म्हणजे जिल्हाधिकारीपदी पदभार स्विकारला आहे. महाराष्ट्रातील मेळघाटच्या एका आदिवासी पाड्यातील युवकाने ही उत्तुंग झेप घेतलीय. सुखदेवे यांनी कागरगिलचे सध्याचे जिल्हाधिकारी उस हक चौधरी यांच्याकडून हा पदभार स्विकारला. त्यानंतर, त्यांच्यावर महाराष्ट्रातून आणि देशभरातील त्यांच्या मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सध्या, कारगिलचे 30 वे जिल्हाधिकारीपदी बनून ते कार्यरत आहेत.
जम्मू आणि काश्मीर कॅडेरच्या 2017 च्या बॅचचे अधिकारी संतोष सुखदेवे यापूर्वी उपजिल्हाधिकारी म्हणून माहोरेच्या अतरिक्त प्रभारी म्हणून काम पाहिलं आहे. पदभार स्विकारल्यानंतर सार्वजनिक सेवा आणि टीमवर्क हेच माझ्या कामाचं घोषवाक्य असल्याचं त्यांनी म्हटलं. संतोष सुखदेवे हे मूळचे मेळघाटमधील (ता. धारणी) नारवाटी या आदिवासी पाड्यातील तरुण आहेत. सध्या ते कारगिलमध्ये कलेक्टर म्हणून रुजू झाले. मेळघाटसारख्या आदिवासी भागातील तरुण कारगिलसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी उच्चपदी जाणं हा महाराष्ट्राचा आणि आदिवासी बांधवांसाठीचा अभिमानास्पद क्षम आहे.
मेळघाटमधील (ता. धारणी) नारवाटी या आदिवासी पाड्यातील संतोष सुखदेवे हे कारगिलमध्ये कलेक्टर म्हणून रुजू झाले. मेळघाटसारख्या आदिवासी भागातील तरुण कारगिलसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी उच्चपदी जाणं अभिमानास्पद आहे. सुखदेवे यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! pic.twitter.com/kkcjzrkgbn
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 25, 2021
आमदार रोहित पवार यांनीही सुखदेवे यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!, असे म्हणत कौतुक केलंय. तसेच, मेळघाटे ते कारगिल या जिद्दीच्या प्रवासाचंही वर्णन त्यांनी आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये केलंय.