संसद सदस्यांनी जनतेत जाऊन संवाद साधावा -नायडू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 06:08 AM2021-02-06T06:08:12+5:302021-02-06T06:09:03+5:30
M. Venkaiah Naidu : संसद सदस्य हे जनतेसाठी आदर्श बनावेत. संसदेच्या प्रतिष्ठेचा होत असलेला क्षय थांबवण्यासाठी संसद सदस्यांनी जनतेत राहावे, त्यांच्याशी संवाद साधावा व त्यांना विकास आणि सशक्तीकरणाचे महत्त्व काय आहे हे समजावून सांगावे
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : संसद सदस्य हे जनतेसाठी आदर्श बनावेत. संसदेच्या प्रतिष्ठेचा होत असलेला क्षय थांबवण्यासाठी संसद सदस्यांनी जनतेत राहावे, त्यांच्याशी संवाद साधावा व त्यांना विकास आणि सशक्तीकरणाचे महत्त्व काय आहे हे समजावून सांगावे, असे आवाहन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केले.
खासदार अभिषेक सिंघवी यांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या कार्यावर लिहिण्यात आलेले पुस्तक “पार्लमेंट्री मैसिंजर इन राजस्थान” चे
व्हॅर्च्युअल लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले त्यावेळी नायडू बोलत होते. पुस्तकाची चर्चा करताना नायडू म्हणाले की, हे पुस्तक इतर संसद सदस्यांना प्रेरणा देईल कारण डॉ. सिंघवी यांनी खासदार निधीचा समाज सेवेसाठी ज्या प्रकारे उपयोग केला ते उत्तम उदाहरण आहे. मागास भागांना केंद्र बिंदू ठेवून दूर अंतरावरील भागांत शिक्षण, आरोग्य आणि लोकांच्या उपयोगाशी संबंधित कार्यात निधीचा केला गेलेला उपयोग हे सिद्ध करतो की, त्यांचे विचार आणि बांधीलकी कुठे रुजली आहे.