अंतर्वस्त्र धुण्यास नकार दिल्याने न्यायाधीशांनी पाठवला मेमो

By admin | Published: March 4, 2016 03:27 PM2016-03-04T15:27:59+5:302016-03-04T15:27:59+5:30

अंतर्वस्त्र धुण्यास नकार दिल्याने न्यायाधीशांनी न्यायालयातील महिला कर्मचा-याला मेमो पाठवल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे

Memo sent to judge for refusing to wash | अंतर्वस्त्र धुण्यास नकार दिल्याने न्यायाधीशांनी पाठवला मेमो

अंतर्वस्त्र धुण्यास नकार दिल्याने न्यायाधीशांनी पाठवला मेमो

Next
>ऑनलाइन लोकमत - 
चेन्नई, दि. ४ - अंतर्वस्त्र धुण्यास नकार दिल्याने न्यायाधीशांनी न्यायालयातील महिला कर्मचा-याला मेमो पाठवल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. न्यायाधीश डी सेल्वम यांनी न्यायलयीन सहाय्यकाला मेमो पाठवून कारवाई करण्याची धमकी दिली आहे. यावर सफाई देताना डी सेल्वम यांनी या महिला कर्मचा-याची नियुक्ती याच कामांसाठी केली असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
 
एनडीटीव्हीने दिेलेल्या वृत्तानुसार न्यायाधीश डी सेल्वम यांनी या 47 वर्षीय महिला कर्मचा-याकडे लिखीत माफी मागितली आहे. आणि पुन्हा अशी चूक होणार याची शाश्वती देण्यास सांगितलं आहे. 1 फेब्रुवारीला हा मेमो पाठवण्यात आला आहे. अंतर्वस्त्र धुण्यास तुम्ही नकार दिल्याबद्दल तुमच्याविरोधात कारवाई का करण्यात येऊ नये याचे उत्तर तुम्ही 7 दिवसांत द्यावे, वॉशिंग मशीनमध्ये ठेवण्यात आलेलं हे अंतर्वस्त्र तुम्ही जाणूनबुजून फेकून दिलतं. आणि तुमच्याकडे याबद्दल विचारणा केली असता तुम्ही न्यायाधीश आणि त्यांच्या पत्नीला उद्धटपणे उत्तर दिलं असल्यांच मेमोमध्ये लिहिण्यातं आलं आहे. 
 
न्यायालयीन सहाय्यक म्हणून महिलेची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र तिला नोकरांची सर्व कामे करण्यास सांगितले जात असल्याची माहिती महिलेच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे. महिेलेला 2 मुली असून घरात कमवणारी ती एकटीच आहे. अनेक न्यायाधीश महाराजांप्रमाणे राहतात आणि त्यांच्या कर्मचा-यांचा नोकरांप्रमाणे वापर करत असल्याचा आरोप न्यायालयातील एका महिला कर्मचा-याने केला आहे.
 

Web Title: Memo sent to judge for refusing to wash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.