आत्महत्यापूर्व चिठ्ठीत इंदूबाईसह वकिलाचा उल्लेख
By admin | Published: February 8, 2016 10:55 PM2016-02-08T22:55:37+5:302016-02-08T22:55:37+5:30
रतन याने लिहीलेल्या आत्महत्यापूर्व चिठ्ठीत पोलीस चौकशी व इंदूबाई हिला कायदेशीर मदत करणार्या एका वकिलाचा उल्लेख आहे. तसेच आपल्या भावाची पत्नीच आपल्याविरुद्ध सतत तक्रारी करीत असते. इंदूबाईने महिलांना आपल्या मागे लावले व खोट्यानाट्या तक्रारी केल्या. पोलिसांनी लागलीच चौकशी केली व त्याचा हकनाक त्रास झाला. राजू, पांडू अशा नावांचाही उल्लेख आत्महत्यापूर्व चिठ्ठीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
Next
र न याने लिहीलेल्या आत्महत्यापूर्व चिठ्ठीत पोलीस चौकशी व इंदूबाई हिला कायदेशीर मदत करणार्या एका वकिलाचा उल्लेख आहे. तसेच आपल्या भावाची पत्नीच आपल्याविरुद्ध सतत तक्रारी करीत असते. इंदूबाईने महिलांना आपल्या मागे लावले व खोट्यानाट्या तक्रारी केल्या. पोलिसांनी लागलीच चौकशी केली व त्याचा हकनाक त्रास झाला. राजू, पांडू अशा नावांचाही उल्लेख आत्महत्यापूर्व चिठ्ठीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणात मयत रतनचा मुलगा विनोद याने तालुका पोलिसात फिर्याद दिली असून, त्यानुसार इंदूबाई शांताराम बाविस्कर विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासंबंधीचा गुन्हा दाखल झाला आहे. कोट-मयत रतन याने आत्महत्या पूर्व लिहिलेली चिठ्ठी दाखविता येणार नाही. त्यात कुठल्याही पोलीस कर्मचार्याचा उल्लेख नाही. या प्रकरणातील आरोपी महिलेच्या अटकेसाठी कार्यवाही सुरू आहे. -सूर्यकांत पाटील, निरीक्षक, जळगाव तालुका पोलीस ठाणे