बुटावर 'ठाकूर' नावाचा उल्लेख, दुकानदार पोलिसांच्या ताब्यात
By महेश गलांडे | Published: January 6, 2021 12:50 PM2021-01-06T12:50:58+5:302021-01-06T12:52:11+5:30
बुलंदशहरच्या गुलावठी येथील ही घटना असून विशाल चौहान यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली होती. बुटाच्या सोलवर ठाकूर या नावाचा उल्लेख करण्यात आल्याचे विशाल यांनी पाहिले होते.
लखनौ - उत्तर प्रदेशातील एका शूज विक्रेत्या दुकानदारावर पोलिसांनी कारवाई केली आहे. ठाकूर नावाच्या ब्रँडचे बूट विकल्याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर दुकानदारास ताब्यात घेण्यात आले आहे. बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.
बुलंदशहरच्या गुलावठी येथील ही घटना असून विशाल चौहान यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली होती. बुटाच्या सोलवर ठाकूर या नावाचा उल्लेख करण्यात आल्याचे विशाल यांनी पाहिले होते. त्यानंतर, यातून जातीवाचक भावना दुखावल्या जात असल्याचं सांगत यास विरोध केला आहे. याबाबत माहिती मिळताच, मोठ्या प्रमाणात लोकं दुकानाबाहेर जमा झाले होते. दुकानदार मोहम्मद नासीर यांनी दुकानाबाहेर जमा झालेल्या नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. ठाकूर हा बुट विक्रीचा ब्रँड असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, विशाल चौहान यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामध्ये, दुकानदार आणि बूट बनविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून बजरंग दल कार्यकर्ते आणि दुकानदार यांच्यात शाब्दीक वाद निर्माण झाल्याचं दिसत आहे.
थाना गुलावठी क्षेत्रान्तर्गत एक व्यक्ति द्वारा जातिसूचक शब्द लिखे जूते बेचने के संबंध में अपर पुलिस अधीक्षक नगर @bulandshahrpol द्वारा दी गई बाईट @CMOfficeUP@UPGovt@dgpup@PrashantK_IPS90@adgzonemeerut@igrangemeerut#UPPolicepic.twitter.com/XJuKukOIXO
— Bulandshahr Police (@bulandshahrpol) January 5, 2021
दरम्यान, आपल्या खासगी वाहनांवर अनेकदा गाडी मालकांकडून जातीचा किंवा धर्माचा उल्लेख केला जातो. तसेच, राजकीय पक्षाच्या नेत्यांचा आणि हटके स्टाईल नंबरप्लेट बनवून एक मेसेज देण्यात येतो. गाडीवरील नंबरवरुन त्या व्यक्तीची किंवा त्यांच्या समुदायाची ओळख दाखवून एक रुबाब दाखविण्यात येतो. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वीच गाडीवरही जातीवाचक नाव लिहिण्यास बंदी घातली आहे.
जातदर्शक नावाच्या वाहनांवरही कारवाई
दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या काचांवर जातीवाचक नावाचा उल्लेख केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, गाडीच्या नंबरप्लेटवरही नावाचा उल्लेख केल्यास संबधित गाडीमालकावर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात अतिरिक्त परिवहन आयुक्त मुकेश चंद्र यांनी राज्यातील सर्व आरटीओंना पत्र पाठवले होते. तसेच, अशा वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.