मर्चंट, अर्बन बँकेचा सन्मान

By admin | Published: April 20, 2015 01:41 AM2015-04-20T01:41:38+5:302015-04-20T13:11:14+5:30

अहमदनगर : नगर मर्चंटस् को-ऑप. बँकेला उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर अर्बन बँकेतील सहायक व्यवस्थापक सतीश शिंगटे यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कारही प्रदान करण्यात आला.

Merchant, Urban Bank's Honor | मर्चंट, अर्बन बँकेचा सन्मान

मर्चंट, अर्बन बँकेचा सन्मान

Next

अहमदनगर : नगर मर्चंटस् को-ऑप. बँकेला उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर अर्बन बँकेतील सहायक व्यवस्थापक सतीश शिंगटे यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कारही प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन, मंुबई यांच्यातर्फे वरील पुरस्कार जाहीर झाले होते. नाशिक विभागातील शंभर कोटीपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी असलेल्या सर्वच बँकांमधून दिला जाणारा उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार मर्चंट बँकेला शनिवारी मुंबईत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार बँकेचे अध्यक्ष आनंदराम मुनोत, उपाध्यक्ष संजीव गांधी, संचालक संजय चोपडा, अनिल पोखरणा, संजय बोरा, मोहन बरमेचा,अजय मुथा, प्रमिला बोरा, मीना मुनोत, सुभाष भांड यांनी स्वीकारला.
कै. बापूसाहेब देशमुख उत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार नगर अर्बंन बँकेचे सहायक व्यवस्थापक सतीश शिंगटे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अर्बन बँकेचे सहायक व्यवस्थापक राजेंद्र डोळे, सतीश रोकडे, प्रशासकीय अधिकारी विलास बडवे उपस्थित होते.

Web Title: Merchant, Urban Bank's Honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.