आणखी महिनाभर चालेल हा गोंधळ

By admin | Published: November 13, 2016 04:53 AM2016-11-13T04:53:43+5:302016-11-13T04:53:43+5:30

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यामुळे जनतेला त्रास होत असल्याबद्दल खेद व्यक्त करीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जनतेला आणखी

A mess for a month will be a mess | आणखी महिनाभर चालेल हा गोंधळ

आणखी महिनाभर चालेल हा गोंधळ

Next

मुंबई : पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यामुळे जनतेला त्रास होत असल्याबद्दल खेद व्यक्त करीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जनतेला आणखी तीन आठवडे संयम राखण्याचे आवाहन केले असले तरी किमान एक महिनाभरहा गोंधळ सुरू राहणार आहे.
जेटली तीन आठवड्यांची भाषा करीत असले तरी १00 रुपयांच्या पुरेशा नोटा उपलब्ध नाहीत. शिवाय ५00 आणि १000 रुपयांच्या नव्या नोटा छापून बँकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. जुन्या नोटा बदलण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना बँका दोन हजारांच्या नोटाच देत आहेत. पण सुटे ना बँकेकडे आहेत ना बाजारात.
त्यामुळे हातात चलन असूनही लोकांचे हाल सुरूच आहे. जोपर्यंत १0, ५0, १00, ५00 आणि १000 रुपयांच्या नवीन नोटा पुरेशा प्रमाणात येत नाहीत, तोपर्यंत लोकांना रोज त्रास सहन करावाच लागणार आहे. (प्रतिनिधी)

थकवा आणि अगतिकता : बँकांमध्ये ५०० आणि एक हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी लांबच लांब रांगा कायम असून तास न तास प्रतीक्षाही कायम आहे. या प्रकारामुळे लोक अगतिक झाले आहेत. पण लोकांच्या त्रासाची दखल घ्यायला कोणीच तयार नाही. धुळे शहरातील एका बँकेसमोर शनिवारी तासन्तास रांगेत उभे राहून दकलेल्या या ज्येष्ठ नागरिकाला अखेर थकून रस्त्यावरच बसणे भाग पडले. त्याचे अनुकरण करीत त्याच्या मागेही असेच दोन तीन जण रस्त्यात बसले.

चार कोटींची रोकड जप्त : मलकापूर (बुलडाणा) येथील हार्डवेअर व्यापाऱ्याकडून चार कोटींची रोकड महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवर शनिवारी जप्त करण्यात आली़ शाहपूर पोलीस ठाण्यात व्यापारी शब्बीर हुसेन यांच्यासह तिघांची आयकर व पोलिसांनी चौकशी केली. या नोटा एक हजारांच्या होत्या.

अनेक ठिकाणी उधारीवर व्यवहार सुरू आहेत तर अनेक व्यवहार बंद आहेत. रामेश्वरममधील मच्छिमारांनी समुद्रात जाणेच बंद केले आहे. समुद्रातून मासे आणले तरी लोकांकडून जुन्या नोटांच्या बदल्यात व्यवहार करायचा कसा, हा त्यांचा प्रश्न आहे. मासे टिकवून ठेवणे आणि उधारीवर विकणे हे दोन्ही त्यांना शक्य नाही.

कमी रकमेच्या नोटा येणार तरी कधी?
नोटांच्या दृष्टीने एटीएम प्रणाली कार्यरत करण्यासाठी वेळ लागणार आहे. तेव्हा जनतेने आणखी तीन आठवडे संयम राखावा, असे जेटली म्हणाले. सध्याच्या एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटा येतच नाहीत.
केवळ १00 रुपयांच्या नोटात त्यातून मिळत आहेत. पण त्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे रांगेतील सर्वांना १00 च्या नोटाच मिळू शकलेल्या नाहीत. शिवाय एटीएममध्ये बदल करताना, त्यातून सर्व आकाराच्या नोटा येतील, अशी व्यवस्था करावीच लागेल.
तीन आठवडे त्यातच जातील, हे उघड आहे. त्याआधी २ हजारपेक्षा कमी रकमेच्या नोटा लोकांच्या हातात कोठून येणार, हा प्रश्नच असून, त्या न मिळाल्यास आर्थिक व्यवहारांवर त्यांचा परिणाम होत राहणार आहे.

दुसरीकडे १0, ५0 व १00 रुपये मूल्य असलेल्या उपलब्ध नोटांचे प्रमाण जेमतेम 14% असून, ते २ हजारांच्या नोटांच्या बदल्यात फारच कमी आहे. त्यामुळे आज अनेकांच्या हातात दोन हजार ़रुपयांच्या नोटा आल्या असल्या तरी त्यांना त्याची मोड द्यायला कोणीच तयार नाही.
आम्ही १00 तर सोडाच, पण ५00 रुपयांच्या वस्तुंची खरेदी करणाऱ्यांना १५00 रुपये परत कसे द्यायचे, असा व्यापाऱ्यांचा सवाल आहे.

केंद्राने जाहीर केल्याप्रमाणे ५00 व १000 ़रुपयांच्या नोटांचे प्रमाण 86 टक्के होते.
ते चलन बाद झाले असले तरी 2000 रुपये मूल्याचे तितके चलन आणणे अशक्य आहे. कारण अन्य मूल्यांच्या नोटा आणायच्या आहेत.


सोने-चांदीच्या व्यवसायात बेकायदा व्यवहार सुरू असल्याचे वृत्त होते. त्यामुळे सरकारने काही ठिकाणी साठ्याची पडताळणी आणि काही व्यवसायिकांच्या व्यवहारांचे मुल्यांकन करण्याचे आदेश दिले होते. तथापि, याबाबत कोणालाही घाबरण्याची गरज नाही. - अरुण जेटली

Web Title: A mess for a month will be a mess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.