एलियन्ससाठी संदेश; १० लाख डॉलरचे बक्षीस
By admin | Published: July 29, 2015 01:54 AM2015-07-29T01:54:23+5:302015-07-29T01:54:23+5:30
एलियन्स किंवा परग्रहवासीयांच्या शोधासाठी १०० दशलक्ष डॉलर खर्च करणारे रशियन उद्योगपती युरी मिल्नर यांनी परग्रहावर राहणाऱ्या या नागरिकांना पाठविण्यासाठी उत्कृष्ट संदेश तयार करणाऱ्या
लंडन : एलियन्स किंवा परग्रहवासीयांच्या शोधासाठी १०० दशलक्ष डॉलर खर्च करणारे रशियन उद्योगपती युरी मिल्नर यांनी परग्रहावर राहणाऱ्या या नागरिकांना पाठविण्यासाठी उत्कृष्ट संदेश तयार करणाऱ्या व्यक्तीला १० लाख डॉलरचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
फ्रँक ड्रेक हे अंतराळवीर १९६० पासून एलियन्सचा शोध घेत असून, त्यांच्या म्हणण्यानुसार या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी हा संदेश मानवी भाषेत लिहिल्यास तो रद्द केला जाईल. काही लोक इंग्रजी भाषेत संदेश तयार करत आहेत, पण ही मोठीच चूक आहे. ड्रेक यांनी आधी आंतरग्रहीय संदेश तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी तयार केलेला हा संदेश पायोनियर व व्हॉयेजर अवकाश यानावर कोरलेला आहे. ही याने आता पृथ्वीपासून सुदूर अंतरावर असणारे पहिले मानवी पदार्थ आहेत. आपण आता पाठविलेला संदेश परग्रहावरील एलियन्सना पोहोचण्यासाठी हजार वर्षे लागतील. तो संदेश घेणाऱ्या मानवांना समजेल असाच संदेश आपल्याला पाठवावा लागणार आहे. आपण त्यांना आम्हाला तुमच्याशी मैत्री करायची आहे असा संदेश दिला तर एलियन्स निराश होतील. लंडनच्या रॉयल सोसायटीत काम करणारे प्रख्यात शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग हे एलियन्सचा शोध घेण्याची १०० दशलक्ष डॉलरची मोहीम राबवत आहेत. पृथ्वीच्या बाहेरच्या विश्वात एलियन्सचा शोध घेण्याकरिता हाती घेण्यात आलेली ही सर्वात मोठी वैज्ञानिक मोहीम मानण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)
काय करता येईल?
- एलियन्सना संदेश पाठविण्यासाठी त्यांच्यात व आपल्यात काय समान आहे याचा विचार केला पाहिजे. रसायनशास्त्राचा विचार केल्यास काही रेषा ओढून आपण त्यांना विविध धातू दाखवू शकतो. प्रकाशाचा उल्लेख एखाद्या चित्रमितीतून करू शकतो.
- पल्सर किरणेही आपल्या दोघात समान असू शकतात. जगाची दीपगृहे म्हणून ओळखले जाणारे पल्सर तारे, न्यूट्रॉन तारे किरणोत्सर्ग करतात, त्यांचा वापर या संदेशात करता येईल, असे ड्रेक यांनी म्हटले आहे.