मोदींच्या ‘रामकथेने’ भाजप खासदार प्रेरित, रामकथेप्रमाणे विकासकामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 02:14 AM2018-02-10T02:14:49+5:302018-02-10T02:15:04+5:30

केंद्र सरकार राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत नेण्यात व लोकप्रिय करण्यात भाजपच्या खासदारांना जे अपयश येत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज आहेत.

Message from Modi's 'Ram Katheene', inspired by the BJP MP, the development of Ramkatha towards the people | मोदींच्या ‘रामकथेने’ भाजप खासदार प्रेरित, रामकथेप्रमाणे विकासकामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा संदेश

मोदींच्या ‘रामकथेने’ भाजप खासदार प्रेरित, रामकथेप्रमाणे विकासकामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा संदेश

Next

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : केंद्र सरकार राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत नेण्यात व लोकप्रिय करण्यात भाजपच्या खासदारांना जे अपयश येत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज आहेत. तसे त्यांनी वेळोवेळी पक्षाच्या बैठकांमध्ये बोलूनही दाखविले आहे. चार देशांच्या दौºयावर रवाना होण्यापूर्वी आज घेतलेल्या बैठकीत भाजपच्या खासदारांना प्रेरित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी चक्क ‘रामकथाह्ण ऐकवली.
आपला मुद्दा अधिक प्रभावीपणे भाजपा खासदारांच्या मनावर ठसविण्यासाठी मोदी म्हणाले की, प्रत्येक शहरात, गावात रामकथेची प्रवचने कुठे ना कुठे होतच असतात. प्रवचनकार भाविकांना नऊ दिवस रामकथा सांगत असतो. ही कथा ऐकायला लोक रोज श्रद्धेने येतात. पण रामकथेच्या समारोपाच्या दिवशी अधिक संख्येने भाविक येतात व प्रसादाचा लाभ घेतात. पण जो माणूस नियमितपणे नऊ दिवस रामकथा सांगतो त्याचा संदेश पोहचविण्याचे काम कोण करणार असा सवाल मोदींनी भाजपा खासदारांना विचारला. रामकथेच्या उदाहरणाच्या माध्यमातून मोदींनी भाजपा खासदारांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली.
केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी व गरिबांच्या हिताचे रक्षण करणारा आहे. त्याची माहितीही खासदारांनी जनतेपर्यंत पोचवावी. भाजपा खासदारांच्या आज घेतलेल्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, राहुल गांधी हे लोकशाहीविरोधी आहेत. त्यांच्याच इशाºयावरुन लोकसभेत बुधवारी पंतप्रधान मोदींच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न काँग्रेस खासदारांनी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला संसदेत पंतप्रधान उत्तर देत असताना याआधी कधीही विरोधी पक्षांकडून अशी हुल्लडबाजी झाली नव्हती.

टिफिन बॉक्स मिटिंग घ्या
केंद्र सरकार राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत नीटपणे पोहोचावी व या योजना लोकप्रिय व्हाव्यात यासाठी भाजपा खासदारांनी बुथ पातळीवर टिफिन बॉक्स बैठका घ्याव्यात, अशी सूचना
नरेंद्र मोदी यांनी आज केली. टिफिन बॉक्स बैठकीसाठी येणारे लोक आपला जेवणाचा डबा सोबत घेऊन येतील. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांविषयी भाजपा खासदाराने या बैठकीत उपस्थितांना सविस्तर माहिती द्यावी. देशातील १० कोटी कुटुंबांसाठी राबविण्यात येणारी स्वास्थ्य विमा योजना तसेच शेतमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट भाव देण्याच्या योजनांचा माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्यासाठी भाजप खासदारांनी प्रयत्न करायला हवेत.

Web Title: Message from Modi's 'Ram Katheene', inspired by the BJP MP, the development of Ramkatha towards the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.