मुलाच्या मृत्यूचा बदला घेणार, शहिदाच्या आईचा पंतप्रधानांना संदेश

By admin | Published: April 28, 2017 01:18 PM2017-04-28T13:18:48+5:302017-04-28T14:14:37+5:30

आयुष यादव यांच्या आईनं मुलाच्या शहीद होण्यावर पंतप्रधानांकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे. तुमच्याकडून कारवाई झाली नाहीतर मी माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला नक्कीच घेणार, असा संदेशही त्यांनी दिला आहे.

Message to the mother of Shahid's mother, taking a change of son's death | मुलाच्या मृत्यूचा बदला घेणार, शहिदाच्या आईचा पंतप्रधानांना संदेश

मुलाच्या मृत्यूचा बदला घेणार, शहिदाच्या आईचा पंतप्रधानांना संदेश

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी (27 एप्रिल) कुपवाडा येथे लष्करी छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. शहीद झालेल्या जवानांमध्ये शहीद कॅप्टन आयुष यादव यांनी दहशतवाद्यांविरोधात देशासाठी लढताना बलिदान दिले.
 
यावर आयुष यादव यांच्या आईनं आपल्या मुलाच्या शहीद होण्यावर पंतप्रधानांकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई करणार नसतील, तर मी मात्र माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला नक्कीच घेणार, असा आक्रोश व्यक्त करत आयुष यादव यांच्या आईनं पंतप्रधान मोदींना संदेश दिला आहे.  
शहीद आयुष यादव यांचे वडील यांनी केंद्र सरकारवर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली आहे.  
 
शहीद आयुष यादव यांच्या वडिलांचे सरकारला प्रश्न
उत्तर प्रदेशातील कानपूर रहिवासी असणारे शहीद आयुष यादव यांचे वडील अरुण यादव यांनी सरकारला विचारले की, "मी तर माझा मुलगा गमावला मात्र कुठंपर्यंत देश आपल्या मुलांना अशाप्रकारे गमावत बसणार आहे". दरम्यान, आयुष यादव हा अरुण यांचा एकुलताएक मुलगा होता.   
 
कुपवाडा दहशतवादी हल्ल्यात 3 जवान शहीद
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे 27 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. पंझगाम येथे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी लष्कर कॅम्पवर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनाही चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवादी संघटना "जैश-ए-मोहम्मद" या हल्ल्यामागे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेजवळ असलेल्या लष्करी कॅम्पमध्ये आत्मघाती स्फोट घडवण्याच्या हेतूने घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र लष्कराने त्यांचा डाव उधळत चोख प्रत्युत्तर दिलं. लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. मात्र, या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले.  
 
छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात 25 जवान शहीद
छत्तीसगड येथील सुकमामध्ये नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ३०० नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह २५ जवान शहीद झाले. सुकमा जिल्ह्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध करत, हे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे निर्धारपूर्वक सांगितले होते.
 
"अशा प्रकारे कधीपर्यंत देशातील जवानांना बलिदान द्यावे लागणार?", शहिदांचे पार्थिव त्यांच्या घरी पोहोचताच त्यांच्या कुटुंबीयांनीही सरकारला प्रश्न विचारत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. 
 

Web Title: Message to the mother of Shahid's mother, taking a change of son's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.