भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:24 IST2025-04-23T15:09:03+5:302025-04-23T15:24:15+5:30
भोपाळजवळ असलेल्या मंडीदीपच्या GAIL प्लांटमधून मिथेन गॅसची गळती सुरू झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
भोपाळपासून सुमारे ३५ किमी अंतरावर असलेल्या रायसेन येथील मंडीदीप औद्योगिक क्षेत्रातील गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड प्लांटमधून मिथेन वायूची गळती झाली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, गॅस गळती वेळेत आटोक्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून, जवळच्या औद्योगिक युनिट्समधील उत्पादन तात्पुरते बंद करण्यात आले आणि रस्ते वाहतूक देखील थांबवण्यात आली आहे.
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
एजन्सीच्या माहितीनुसार, ही घटना पहाटे २ च्या सुमारास घडली. मिथेन हा अत्यंत ज्वलनशील, रंगहीन आणि गंधहीन वायू आहे, जो आग लागल्यास गंभीर धोका निर्माण करू शकतो. गळतीची तक्रार येताच प्रशासनाने तातडीने कारवाई केली आणि प्लांटच्या २०० मीटर परिसरातील सर्व युनिट्सचे कामकाज बंद केले आणि रस्ता देखील बंद करण्यात आला.
वायू हवेत पसरला, या घटनेत कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सध्या, प्लांटमधील उत्पादन काम थांबवण्यात आले आहे आणि सुरक्षा उपायांचा आढावा घेतला जात आहे. रात्रभर घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी आणि तज्ञ तैनात करण्यात आले आहेत आणि प्लांटची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी व्यापक पावले उचलली जात आहेत.
मंडीदीप इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष राजीव अग्रवाल म्हणाले की, ही लेव्हल-३ गॅस गळतीची घटना होती, ती गंभीर मानली जाते. कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे. गळतीस कारणीभूत असलेल्या उपकरणांची तज्ञांनी दुरुस्ती केली आहे. स्थानिक प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.