#MeToo : अकबर यांच्या पत्नीकडून पाठराखण; ती पत्रकार खोटे बोलतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 04:02 PM2018-11-02T16:02:18+5:302018-11-02T16:04:55+5:30
एम. जे. अकबर यांच्यावर अमेरिकेतील भारतीय महिला पत्रकारानेही बलात्काराचे आरोप केले आहेत.
नवी दिल्ली : लैंगिक शोषणाचे आरोप असलेले भाजपचे नेते एम. जे. अकबर यांच्यावर अमेरिकेतील भारतीय महिला पत्रकारानेही कपडे फाडल्याचे आणि बलात्काराचे आरोप केले आहेत. यावरून अकबर यांची पत्नी मल्लिका अकबर यांनी एम. जे. यांची पाठराखण करत ती महिला पत्रकार खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.
भारतीय पत्रकार पल्लवी गोगोई 23 वर्षांपूर्वी एशियन एजमध्ये काम करत होती. सध्या त्या नॅशनल पब्लिक रेडियोमध्ये काम करतात. एशियन एजमध्ये असताना पल्लवी जयपूरमध्ये एका स्टोरीवर काम करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी अकबर प्रसिद्ध संपादक होते. दोनवेळा चुंबनाचे प्रयत्न केल्यानंतर तिसऱ्यावेळी अकबर यांनी पल्लवी यांचे कपडे फाडले व बलात्कार केल्याचा आरोप पल्लवी यांनी केला आहे. याबाबतचे त्यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टमध्ये सांगितले आहे.
#MeToo : अकबर यांच्यावर आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप
याविरोधात एम. जे. अकबर यांची पत्नी मल्लिका यांनी पल्लवी गोगोई यांच्या हेतूवरच संशय व्यक्त केला आहे. पल्लवी खोटे का बोलत आहे, हे माहिती नाही. पण ते खोटेच आहे, असे त्यांनी एएनआयशी बोलताना म्हटले आहे.
I don't know Pallavi's reasons for telling this lie, but a lie it is: #MJAkbar's wife Mallika Akbar to ANI on journalist Pallavi Gogoi's rape allegations in the Washington Post against her husband pic.twitter.com/SFws1TwWhx
— ANI (@ANI) November 2, 2018
तर एम. जे. अकबर यांनीही बलात्काराचे आरोप फेटाळताना पल्लवीशी आपले प्रेमसंबंध होते आणि तिच्या संमतीनेच सारे काही झाले होते, अशी कबुलीही त्यांनी दिली आहे.
Somewhere around 1994, Ms. Pallavi Gogoi&I entered into consensual relationship that spanned several months.This relationship gave rise to talk &would later cause strife in my home life as well. This consensual relationship ended, perhaps not on best note: MJ Akbar to ANI
— ANI (@ANI) November 2, 2018
On Oct 29, the Washington Post forwarded to my lawyers a series of cryptic and non-specific questions, regarding incidents alleged to have taken place approximately 23 years ago. These allegations were false and were consequently denied: MJ Akbar's statement to ANI pic.twitter.com/bbNepoV3Y9
— ANI (@ANI) November 2, 2018