दिल्ली मेट्रोसोबतचा प्रवास थांबला; 'मेट्रोमॅन' ई. श्रीधरन यांनी दिला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 10:58 AM2021-03-11T10:58:39+5:302021-03-11T11:02:04+5:30

ई. श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रमुख सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे.

metro man e sreedharan resign from delhi metro rail corporation | दिल्ली मेट्रोसोबतचा प्रवास थांबला; 'मेट्रोमॅन' ई. श्रीधरन यांनी दिला राजीनामा

दिल्ली मेट्रोसोबतचा प्रवास थांबला; 'मेट्रोमॅन' ई. श्रीधरन यांनी दिला राजीनामा

Next
ठळक मुद्देई. श्रीधरन यांचा दिल्ली मेट्रोचा राजीनामाराजकीय इनिंग सुरू केल्यानंतर राजीनाम्याची औपचारिकता पूर्णपक्ष सांगेल, तिथून निवडणूक लढवेन - ई. श्रीधरन

नवी दिल्ली : केरळ विधानसभा निवडणुकांच्या (Kerala Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या मेट्रोमॅन ई. श्रीधरन (e sreedharan) यांचा नवीन राजकीय प्रवास सुरू झाला आहे. ई. श्रीधरन यांचे नाव केरळचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारांमध्ये आघाडीवर आहे. केरळ भाजपमधील स्थानिक नेतृत्वाला ई. श्रीधरन मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असावा, असे वाटत असले, तरी पक्षश्रेष्ठींनी अद्याप यावर भूमिका मांडलेली नाही. अशातच ई. श्रीधरन यांनी दिल्लीमेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रमुख सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. (metro man e sreedharan resign from delhi metro rail corporation) 

केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दिल्ली मेट्रोच्या प्रमुख सल्लागार पदाचा राजीनामा देण्याची औपचारिकता ई. श्रीधरन यांनी बुधवारी पूर्ण केली, अशी माहिती मिळाली आहे. केरळ विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे त्यांनी यापूर्वीच सांगितले होते. सन १९९७ मध्ये ई. श्रीधरन यांचा दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबतचा प्रवास सुरू झाला. तर, ०४ मार्च २०२१ रोजी ई. श्रीधरन दिल्ली मेट्रोच्या गणवेषात शेवटचे दिसले होते. पलारीवेट्टम येथील एका बांधकाम सुरू असलेल्या पुलाची पाहणी करण्यासाठी ते तेथे गेले होते. 

ई. श्रीधरन केरळच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत की नाही? भाजप मंत्र्याचा युटर्न 

९० दिवसांचे काम ४६ दिवसांत

डिसेंबर १९६४ मध्ये बांधण्यात आलेला पम्बन पुलाच्या काही भागाला दुर्दैवीरित्या जलसमाधी मिळाल्यानंतर त्याचे काम ई. श्रीधरन यांच्याकडे सोपवण्यात आले. तेव्हा ते केवळ ३२ वर्षांचे होते. पम्बन पुलाच्या पुनर्निमितीसाठी ९० दिवसांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. मात्र, दक्षिण रेल्वेने हे लक्ष्य तीन महिन्यांवर आणले. ई. श्रीधरन यांनी ९० दिवसांचे काम ४६ दिवसांत करून दाखवले. तत्कालीन रेल्वेमंत्र्यांना सुखद धक्का बसला. यासाठी ई. श्रीधरन यांना खास बक्षीस देण्यात आले होते. 

पक्ष सांगेल, तिथून निवडणूक लढवेन

भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना केरळ विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा ई. श्रीधरन यांनी व्यक्त केली. पक्ष सांगेल, तिथून निवडणूक लढवने, असे ई. श्रीधरन यांनी म्हटले होते. भाजपला केरळमध्ये अधिकाधिक संख्येने निवडून आणण्याचा माझा प्रयत्न असेल. पक्षाकडून सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पडण्यास नेहमी सज्ज असेन. मात्र, एखाद्या राज्याचा राज्यपाल होण्याची माझी कोणतीही इच्छा नाही. राज्यपालांचे पद पूर्णपणे घटनात्मक आहे. राज्यपालांना फारसे अधिकार नसतात. राज्यपाल बनल्यानंतर राज्यासाठी अपेक्षित योगदान देऊ शकणार नाही, असे श्रीधरन यांनी सांगितले. 

Web Title: metro man e sreedharan resign from delhi metro rail corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.