दिल्लीतील मेट्रो सेवा १७0 दिवसांनंतर पूर्ववत; एअरपोर्ट एक्स्प्रेस लाईनवर वाहतूक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 12:31 AM2020-09-13T00:31:53+5:302020-09-13T00:32:15+5:30
कोविड-१९ महामारीमुळे मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती.
नवी दिल्ली : दिल्ली मेट्रो सेवा शनिवारी पूर्णांशाने सुरू झाली. दिल्ली मेट्रोची एअरपोर्ट एक्स्प्रेस लाईन १७0 दिवसांनंतर पुन्हा खुली करण्यात आल्यानंतर मेट्रोच्या सर्व मार्गावरील सेवा सुरळीत झाली आहे.
कोविड-१९ महामारीमुळे मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती. ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत टप्प्याटप्प्याने ती पुन्हा सुरू करण्यात आली. आता मेट्रो नेटवर्कचे सर्व कॉरिडॉर कार्यरत झाले आहेत. कोविड-१९ च्या आधीच्याप्रमाणे सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत मेट्रोसेवा सुरू राहील.
दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने (डीएमआरसी) एका टष्ट्वीटमध्ये म्हटले की, एअरपोर्ट एक्स्प्रेस लाईनवरील सेवा सुरू झाल्यानंतर आता दिल्ली मेट्रो नेटवर्क पूर्णत: सेवेसाठी खुले झाले आहे. प्रवास करताना प्रवाशांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
सोमवारी दिल्ली मेट्रोने यलो लाईन आणि रॅपिड मेट्रो सेवा पूर्ववत केली होती. कोविड-१९ महामारीच्या उद्रेकानंतर २२ मार्च रोजी मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती.
केंद्रीय गृहमंत्रालयाने अलीकडेच टप्प्याटप्प्याने वाहतूक सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डीएमआरसीने ७ ते
१२ सप्टेंबरदरम्यान तीन टप्प्यांत
सेवा पूर्ववत करण्याची घोषणा केली होती.
तीन टप्प्यांत अशी सुरू झाली मेट्रो
मेट्रो रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, यलो लाईन अथवा लाईन-२ आणि रॅपिड मेट्रो पहिल्या टप्प्यात मर्यादित वेळेसाठी सुरू करण्यात आली. शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात वेळ वाढविण्यात आली. शनिवारी तिसºया टप्प्यात सेवा पूर्णांशाने सुरू करण्यात आली.