मेट्रोत साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:09 AM2017-08-15T01:09:49+5:302017-08-15T01:09:51+5:30
ही घटना आहे अमेरिकेच्या मेसाच्युसेटसची. एका मेट्रोमध्ये अचानक एका बॅगमधून एक साप बाहेर पडतो आणि उपस्थित प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकतो
Next
ही घटना आहे अमेरिकेच्या मेसाच्युसेटसची. एका मेट्रोमध्ये अचानक एका बॅगमधून एक साप बाहेर पडतो आणि उपस्थित प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकतो. एका महिलेने या सापाचा व्हिडिओ तयार करुन व्टिटरवर पोस्ट केला. त्यासोबतच मेट्रोलाही विचारणा केली की, मेट्रो प्रवासात साप घेऊन जाण्यास परवानगी आहे काय? या व्हिडिओवर सद्या जोरदार चर्चा सुरु आहे. या महिलेच्या प्रश्नाला उत्तर देताना मेट्रोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, प्रवासात साप घेऊन जाण्यास परवानगी आहे. पण, साप बंद पेटीत नेणे बंधनकारक आहे. मात्र, या प्रवाशाने हा साप खुल्या बॅगमध्ये ठेवला होता.