देशात प्रथमच पाण्याखालून धावणार मेट्रो!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 10:30 AM2024-03-07T10:30:56+5:302024-03-07T10:32:54+5:30
पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एस्प्लनेड-हावडा मैदान भागात ही मेट्रो हुगळी नदीतील पाण्याखालून बांधलेल्या बोगद्यातून धावणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.
कोलकाता : देशातील पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उद्घाटन केले. पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एस्प्लनेड-हावडा मैदान भागात ही मेट्रो हुगळी नदीतील पाण्याखालून बांधलेल्या बोगद्यातून धावणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.
मेट्रो मार्गाचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
मेट्रोची वैशिष्ट्ये
मेट्रोच्या मार्गाची लांबी १६.६ किमी आहे. त्यातील १०.८ किमीचा मार्ग भुयारी आहे.
देशात एखाद्या नदीखाली सर्वांत खोल बांधलेला बोगदा अशी या बोगद्याची ओळख आहे.
या मेट्रोच्या मार्गातील ४.८ किमीचा एक मार्ग हावडा व सॉल्ट
लेकला जोडतो.
हुगळी नदीच्या पाण्याखालून जाणाऱ्या या भुयारी मेट्रो मार्गात सहा
स्थानके आहेत. त्यातील चार स्थानके ही भुयारी आहेत.
हुगळी नदीच्या पात्राचा ५२० मीटर लांबीचा भाग ही मेट्रो केवळ ४५ सेकंदांमध्ये पार करते.
ही मेट्रो चालविण्यासाठी ऑटोमॅटिक ट्रेन ऑपरेशन (एटीओ) या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केला जातो.
४९६०कोटी
खर्च किती आला?
७ ते १०लाख
किती लोकांना फायदा?
एप्रिल २००९
काम कधी सुरू?
२०१७
बोगदा तयार करण्यास केव्हा सुरुवात?
एप्रिल २०२३
चाचणी कधी?
फायदा काय?
- रस्त्यावरील गर्दी कमी होणार
- वाहनांचे प्रदूषण कमी होणार
- प्रवासातील वेळ वाचणार
- प्रवाशांना अखंड, सोपा आणि आरामदायी प्रवास करता येणार
- मेट्रोच्या तिकिटाची किंमत पहिल्या दोन किमीसाठी फक्त ५ रुपये आहे. त्यानंतर यात वाढ होत ती १०, १५,२०,२५ आणि ५० रुपयांपर्यंत आहे.
मोदींचाही प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मेट्रोतून एस्प्लनेड ते हावडा मैदानपर्यंतचा प्रवासही केला. त्यावेळी मेट्रोच्या डब्यात काही शालेय विद्यार्थीही होते.
देशातील सर्वांत खोल मेट्रो स्टेशन
हावडा मेट्रो स्टेशन जमिनीपासून ३२ मीटर खोल बांधण्यात आले आहे. इतक्या खोलवर बांधलेले हे देशातील पहिलेच मेट्रो रेल्वे स्टेशन आहे. सध्या, पाण्याखालील मेट्रो मार्ग फक्त लंडन आणि पॅरिसमध्येच आहे.