हरियाणातील नूहंमध्ये गॅस लीक; 24 कामगारांची प्रकृती खालावली, उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 11:50 AM2023-11-15T11:50:23+5:302023-11-15T11:51:29+5:30

गॅस लीक झाल्यामुळे कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि 24 कामगार आजारी पडले.

mewat nitrogen gas leak at nuh slaughter house 24 laborer admitted to hospital | हरियाणातील नूहंमध्ये गॅस लीक; 24 कामगारांची प्रकृती खालावली, उपचार सुरू

फोटो - hindi.news18

हरियाणातील नूहं जिल्ह्यातील एका कत्तलखान्यात गॅस लीक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे 24 मजुरांची प्रकृती खालावली. या सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुग्राम-अलवर राष्ट्रीय महामार्ग 248A वर मंडीखेडा गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या एलेना मीट फॅक्टरीमध्ये ही घटना घडली. आहे. 

मीट फॅक्टरीमध्ये नायट्रोजन गॅस लीक झाल्याचं सांगण्यात येत आहे. गॅस लीक झाल्यामुळे कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि 24 कामगार आजारी पडले. नायट्रोजन गॅस लीकची माहिती कारखान्याच्या व्यवस्थापनाला समजताच त्यांना धक्काच बसला. 

कामगारांना एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मंडी खेडा येथील अल आफिया जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले. जखमींमध्ये मुलींचाही समावेश आहे. आजारी पडणाऱ्या कामगारांची संख्या आणखी वाढू शकते. नायट्रोजन गॅस लीक कसा झाला याबाबतची माहिती समोर आलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: mewat nitrogen gas leak at nuh slaughter house 24 laborer admitted to hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.