कोरोनावर गृह मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्स जारी; टेस्ट, ट्रॅक, ट्रिट ची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 08:25 PM2021-03-23T20:25:28+5:302021-03-23T20:28:07+5:30
Coronavirus in India : कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून कोरोनाबाधिताच्या संपर्कात येणाऱ्यांना आयसोलेट करण्याच्या सूचना
देशात सध्या कोरोना विषाणूनं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्स १ एप्रिल पासून ३० एप्रिलपर्यंत लागू होणार आहेत.
गृहमंत्रालयानं सांगितल्यानुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये देशाच्या सर्वच भागात टेस्ट, ट्रॅक आणि ट्रिट या प्रोटोकॉलची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी RTPCR चाचण्यांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी त्या तेजीनं वाढवण्यात याव्यात. जेणेकरून याचं ध्येय ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक निर्धारित करण्यात आलेल्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल, असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंटेन्मेंन्ट झोनच्या बाहेर अधिक बाबींना परवानगी देण्यात येईल. यामध्ये प्रवासी ट्रेन, हवाई वाहतूक, मेट्रो ट्रेन, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, रेस्तराँ, मॉल्स, मल्टीप्लेक्स, एन्टरटेन्मेंट पार्क, योगा सेंटर्स आणि एक्झिबिशन सुरू राहणार असल्याचंही नमूद करम्यात आलं आहे.
ज्यावेळी कोरोनाच्या नव्या केसबद्दल माहिती मिळेल त्याच वेळी त्याच्यावर उपचार झाले पाहिजे. याशिवाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातूनही सपर्कात आलेल्या लोकांना आयसोलेट करण्यात यावं. झोनची माहिती जिल्हाधिकारी वेबसाईटवर टाकतील आणि ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयालाही देतील, असं यात नमूद करमअयात आलं आहे. कामाच्या ठिकाणी तसंच गर्दीच्या ठिकाण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या सर्व उपाययोजना असायला हव्या. याशिवाय टेस्ट, ट्रॅक आणि ट्रिट या प्रोटोकॉलचं पालनही महत्त्वाचं असल्याचं गृह सचिव अजय भल्ला यांनी नमूद केलं.
MHA issues order with guidelines for effective control of #COVIDー19 which will be effective from April 1, 2021, and remain in force up to April 30, 2021.
— ANI (@ANI) March 23, 2021
The guidelines mandate the State/UT Govts to strictly enforce the Test- Track-Treat protocol in all parts of the country. pic.twitter.com/QEevzYmCfh
लसीकरणाची मंदावलेली गती चिंताजनक
"भारत सरकारनं कोरोनाच्या विरोधात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. परंतु काही राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग कमी आहे. हा अतिशय चिंतेचा विषय आहे. सध्या करोना प्रतिबंधात्मक लसीकरण ट्रान्समिशनची साखळी तोडण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. यासाठी लसीकरणाचा वेग वाढवायला हवा," असं भल्ला म्हणाले.
जिल्हा, शहर, वॉर्ड पातळीवर निर्बंध घालता येणार
कन्टेन्मेंन्ट झोनच्याच्या नियमांच्या पालनाची जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची असेल. यासाठी याची जबाबदारी राज्य सरकारांकडूनही ठरवता येईल. कामाच्या ठिकाणी नियम ठरवण्यासाठी राज्यांना अधिकार देण्यात आले आहेत. तसंच मास्क, हायजिन, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचं कठोरपणे पालन करून घेणं आणि त्यावर दंड आकारण्याचे अधिकारही राज्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय राज्यांना जिल्हा, शहर किंवा वॉर्डाच्या पातळीवरही कोरोनाशी निगडीत निर्बंध घालण्याचे अधिकार देण्यात आहेत. दरम्यान, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यावर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत.