केरळमध्ये काँग्रेसचे खासदार एमआई शानवास यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 08:42 AM2018-11-21T08:42:03+5:302018-11-21T08:42:12+5:30
केरळमधले काँग्रेसचे खासदार एमआई शानवास यांचं निधन झालं आहे. तामिळनाडूमधल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्या उपचार सुरू होते.
तिरुअनंतपूरम- केरळमधले काँग्रेसचे खासदार एमआई शानवास यांचं निधन झालं आहे. तामिळनाडूमधल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्या उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वायनाड या मतदारसंघातून ते काँग्रेसचे खासदार होते. वरिष्ठ काँग्रेस नेते आणि लोकसभा खासदार एमआय शानवास हे 67 वर्षांचे होते. त्यांनी चेन्नईतल्या के डॉ. रॉय इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना आजारानं पछाडलं होतं.
2 नोव्हेंबरला त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली असून, त्याच्या एक दिवसापूर्वीच त्यांना छातीत दुखत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. संसर्गामुळे ते गंभीररीत्या आजारी होते. गुरुवारी उद्या सकाळी 10 वाजता एर्नाकुलम थॉटमच्या दफनभूमीत दफन करण्यात येणार आहे. शानवास यांचा जन्म 22 सप्टेंबर 1951 रोजी प्रसिद्ध वकील इब्राहिम कुट्टी आणि नूरजहाँ बेगम यांच्या घरी झाला. त्यांची पत्नी जुबैदियत हिच्यापासून त्यांना दोन मुलं झाली.
शानवास यांचं राजकीय कारकीर्द 1978मध्ये सुरू झाली. त्यांनी 1978मध्ये युवक काँग्रेसचं उपाध्यक्ष, 1983मध्ये केपीसीसी संयुक्त सचिव आणि 1985मध्ये केपीसीसीचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं. 1987मध्ये वडाक्केकर मतदारसंघातून निवडणूक लढले, 1991मधून पट्टांबीच्या विधानसभा निवडणूक आणि 1999मध्ये पिरवाय्या लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढले. 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला असून, 2014मध्ये ते पुन्हा खासदार झाले.
Congress Kerala working President and Wayanad MP M.I. Shanavas passes away. He was undergoing treatment at a private hospital in Chennai, Tamil Nadu. pic.twitter.com/8DOeKNiiPo
— ANI (@ANI) November 21, 2018