मायकल फेरेरा यांना अटक

By admin | Published: October 20, 2016 04:24 AM2016-10-20T04:24:46+5:302016-10-20T04:24:46+5:30

४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी विश्व बिलियडर््स चॅम्पियन आणि पद्मभूषण सन्मानित मायकल फेरेरा यांच्यासह अन्य तीन व्यक्तींना हैदराबाद पोलिसांनी अटक केली

Michael Ferrera arrested | मायकल फेरेरा यांना अटक

मायकल फेरेरा यांना अटक

Next


हैदराबाद : मार्केटिंग कंपनी क्यूनेटशी निगडित सुमारे ४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी विश्व बिलियडर््स चॅम्पियन आणि पद्मभूषण सन्मानित मायकल फेरेरा यांच्यासह अन्य तीन व्यक्तींना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे.
७८ वर्षीय फेरेरा यांनी गेल्याच महिन्यात स्वत:ला मुंबई पोलिसांच्या हवाली केले होते; मात्र चौकशी प्रक्रियेमध्ये त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळत नव्हते. तसेच, याआधी ते न्यायालयाकडून सुरक्षा मिळण्याची मागणी करीत होते. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी फेरेरा यांच्यासह तिघांना अटक केली.
फेरेरा आणि इतर तीन व्यक्ती ज्या कंपनीशी जोडले गेले होते, ती कंपनी एक बनावट योजना चालवीत होती. या योजनेनुसार, लोकांना ३० हजारांपासून ७.५ लाखांपर्यंत गुंतवणूक करण्यास सांगितले जात होते. कंपनीवर आरोप होता, की ते हा सर्व पैसा देशाबाहेर पाठवत होते. विशेष म्हणजे, काही गुंतवणूकदारांनीच कंपनीविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता. मायकल फेरेरा यांना १९८३मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Michael Ferrera arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.